• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Thursday, August 13, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश📰 अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन📰 दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा📰 सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब📰 हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या 'झिरो टॉलरन्स' धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

न्यायालयाच्या इमारतीचा दर्शनी भाग तुळजाभवानी देवीच्या मंदिराशी साधर्म्य असणाऱ्या बांधकामासाठी निधी कमी पडू देणार नाही – आ.राणाजगजितसिंह पाटील

MH25News by MH25News
September 10, 2024
in Blog
0
न्यायालयाच्या इमारतीचा दर्शनी भाग तुळजाभवानी देवीच्या मंदिराशी साधर्म्य असणाऱ्या बांधकामासाठी निधी कमी पडू देणार नाही – आ.राणाजगजितसिंह पाटील
0
SHARES
102
VIEWS

धाराशिव – तुळजापूर येथील न्यायालयाच्या इमारतीचा दर्शनी भाग तुळजाभवानी मंदिराशी साधर्म्य असलेले राहणार आहे. इमारतीच्या दर्शनी भागात दगडी बांधकाम प्रस्तावित करण्यात आले आहे. तालुकस्तरीय न्यायालयाच्या सुधारित आराखड्याप्रमाणे राज्यात होणारी ही पहिलीच इमारत आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू देणार नाही, अशा शब्दांत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ग्वाही दिली. तुळजापूर येथील न्यायालयासंदर्भात विधीज्ञ मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी आज आ. राणाजगजितसिंह पाटील यांची भेट घेतली.

आमदार पाटील यांनी इमारत बांधकामाची पाहणी करून आढावा घेतला. न्यायालयाचे जवळपास काम पूर्ण होत आले आहे. अत्यंत आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या या इमारतीचा दर्शनी भाग कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या मंदिराशी साधर्म्य असलेला साकारण्यात येणार आहे. न्यायालयाच्या नवीन इमारतीचा आराखडा तयार करण्यात आल्यानंतर राज्यातील हे पहिले बांधकाम असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.
या इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करून या ठिकाणी न्यायालयीन कामकाज सुरू करण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. या बांधकामासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असा शब्दही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर विधीज्ञ मंडळास दिला.
तुळजापूर येथील दिवाणी न्यायालयाची इमारत जुनी होती व कामकाजासाठी जागा अपुरी पडत होती. त्यामुळे हंगरगा (तुळ) येथे दोन हेक्टर जागेत न्यायालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या नवीन इमारतीमध्ये तळमजला व अधिक दोन मजले आहेत.

Follow us on social media:

सर्व सोयी-सुविधांनी युक्त असलेल्या न्यायालयाच्या इमारतीवर सौरऊर्जा प्रकल्पही असणार आहे. त्याचबरोबर पावसाच्या पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन करून जमिनी खाली तयार करण्यात आलेल्या टाकीत साठवणूक केली जाणार आहे. या पाण्याचा वापर न्यायालय परिसरातील उद्यान आणि वृक्षसंगोपनासाठी केला जाणार आहे. इमारत बांधकामास सुरुवात करतेवेळीच परिसरात सर्व बाजूंनी वड, पिंपळ, करंज, कदंब, बकुळ, बहावा, रुद्राक्ष, कडुलिंब, नारळ यासारखी भारतीय प्रजातीची जवळपास 300 झाडे लावण्यात आली आहेत. विधिज्ञ मंडळाच्या सदस्यांनी देखील यामध्ये सातत्याने लक्ष दिले. पाठपुरावा केला आहे. इमारतीचे बांधकाम जून 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी  सांगितले.

यावेळी तुळजाभवानी मंदिर देवस्थानचे महंत श्री तुकोबा बुवा महाराज, नारायण नन्ननवरे, विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.

संबंधित बातम्या

येरमाळा पोलीस स्टेशन चे वादग्रस्त एपीआय टी.आर. भालेराव अखेर निलंबित
Blog

येरमाळा पोलीस स्टेशन चे वादग्रस्त एपीआय टी.आर. भालेराव अखेर निलंबित

May 31, 2026
श्री सरस्वती विद्यालय रामेश्वर मध्ये 25 वर्षानंतर रंगला स्नेह मेळावा
Blog

श्री सरस्वती विद्यालय रामेश्वर मध्ये 25 वर्षानंतर रंगला स्नेह मेळावा

October 26, 2025
Blog

शेतीचा वादाचा झाला खुनामध्ये शेवट पती-पत्नीचा भर रस्त्यात कोयत्याने वार करत खून

August 13, 2025
Blog

मंदिर संस्थान कार्यालय येथे मद्यपान करून तोडफोड; पुजाऱ्यावर गुन्हा दाखल

May 14, 2025
आ.कैलास पाटील यांचा गाव भेट दौऱ्यावर धडाका
Blog

आ.कैलास पाटील यांचा गाव भेट दौऱ्यावर धडाका

November 13, 2024
आ.कैलास पाटील यांच्या प्रचाराचा नारळ देवधानोरा गावातून फुटणार
Blog

आ.कैलास पाटील यांच्या प्रचाराचा नारळ देवधानोरा गावातून फुटणार

November 1, 2024

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
  • अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
  • दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
  • सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
  • हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!