• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, September 26, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध📰 शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

१७४ कोटींच्या कामांचे गडकरींच्या हस्ते भूमिपूजन

MH25News by MH25News
February 22, 2024
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
१७४ कोटींच्या कामांचे गडकरींच्या हस्ते भूमिपूजन
0
SHARES
0
VIEWS

जिल्ह्याचा सर्वंकश विकास; शुक्रवारी चर्चासत्र

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

धाराशिव – जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलून टाकण्याची क्षमता असणारे अनेक महत्वपूर्ण प्रकल्प महायुती सरकारमुळे निर्णायक टप्प्यात आहेत. आणखी नवे महत्वाचे प्रकल्प जिल्ह्यासाठी मंजूर झाले आहेत. जिल्ह्याच्या सकल उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट निश्चित करुन,रोजगारनिर्मिती सह जिल्ह्याच्या विकासाचे घटक ठरवून त्याप्रमाणे आराखडा तयार करण्यासाठी एक सजग जिल्हावासीय म्हणून सर्वांचा सहभागही महत्वपूर्ण आहे. त्यासाठीच सामूहिक हिताच्या सूचना, महत्वाचे प्रश्न, अडचणी यावर साधकबाधक चर्चा करण्याकरिता १७४ कोटींच्या कामांना जोडून जिल्हा विकासाच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

शहरातील सिध्दाई मंगल कार्यालयात शुक्रवार, २३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता होणार्‍या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. चर्चासत्रात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी,मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविणसिंह परदेशी, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Follow us on social media:

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कौडगाव एमआयडीसीतील तांत्रिक वस्त्रोद्योग प्रकल्प, श्री तुळजाभवानी देवीचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा हे प्रकल्प मंजूर असून प्रगतीपथावर आहेत. या व्यतिरिक्त नियोजित सूरत-चेन्नई महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग तसेच विविध प्रक्रिया उद्योगांचे क्लस्टर, अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा अधिक वापर करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची निर्मिती, त्यासाठी लागणारे मनुष्यबळ, अशा विविध पातळ्यांवर सध्या वेगाने काम सुरू आहे.जिल्ह्याच्या सकल उत्पन्न वाढीसाठी व रोजगारनिर्मितीसाठी नाविन्यपूर्ण आणि जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाच्या संकल्पना प्रत्यक्षात येण्यापूर्वी विचारविनिमय व मंथन आवश्यक आहे. त्यासाठीच या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील नागरिकांसह उद्योजक व विविध क्षेत्रातील तज्ञांनीही उपस्थित राहून आपल्या अनमोल सूचना मांडाव्यात, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे.

१७४ कोटींच्या कामांचे गडकरींच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन

धाराशिव शहरातील पर्यायी रस्ता, येडशी उड्डाणपुल, सिंदफळ जवळील लातूर रोड जंक्शन उड्डाणपुल अशा विविध कामांसाठी १७४ कोटी रूपयांच्या कामांचे भूमिपूजन या चर्चासत्रापूर्वी केले जाणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ऑनलाईन पध्दतीने हे भूमिपूजन करणार आहेत. त्यानंतर जिल्ह्याच्या सकल उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026
धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
अर्थव्यवस्था

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

September 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!