• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Thursday, August 13, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश📰 अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन📰 दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा📰 सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब📰 हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या 'झिरो टॉलरन्स' धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

परंडा पोलीसांनी पकडला 85 किलो गांजा

MH25News by MH25News
December 26, 2023
in अर्थव्यवस्था, क्राइम, ग्रामीण, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
परंडा पोलीसांनी पकडला 85 किलो गांजा
0
SHARES
0
VIEWS

परंडा – परंडा पोलीस ठाणे पोलीसांना दिनांक २४/१२/२०२३ रोजी मौजे ईडा ता. भूम, जि. धाराशिव येथे संतोष संजय जाधव या व्यक्तिने फार मोठ्या प्रमाणात गांजाची साठवणूक केलेली आहे अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली. गोपनीय माहितीबाबत वरोष्ठांना कळवून मौजे ईडा येथे सदरील व्यक्तीच्या घरी शहानिशा करण्याच्या उद्देशाने गेले असता सदरील घर बंद असून दरवाज्याला कुलूप लावलेले आढळून आले. सदरील घर हे नमूद आरोपी संतोष संजय जाधव यांचेच असल्याबाबत पोलीस पाटील यांना विचारून खात्री केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी महसूल विभागाचे प्रतिनिधी, वजन मापे निरीक्षक, दोन शासकीय पंच यांना सोबत घेऊन सदरील घरावरती घर मालकाच्या नातेवाईकांचे समक्ष छापा टाकण्यात आला. सदरील छाप्याच्या दरम्यान घरामध्ये १२,८०,४९० इतक्या रकमेचा एकूण ८५ किलो ३६६ ग्रॅम एवढ्या वजनाचा गांजा या वनस्पतीचे पान, बोंड आणि बिया यांचा समावेश असलेले गुंगीकारक नशेसाठी वापरला जाणारा गांजा आढळून आला. घराची सखोल तपासणी करून सदरील गांजा शासकीय पंचांच्या समक्ष जप्त करण्यात आला. ईडा हे गाव पोलीस स्टेशन परंडा अंतर्गत येते तथापी पोलीस स्टेशन परंडा पासून ईडा हे गाव अंदाजे २५ किलोमीटर लांबीवर असून अत्यंत दुर्गम भागात वसलेले आहे याचाच फायदा घेऊन आरोपी संतोष संजय जाधव यांनी गांजा विक्रीचा व्यवसाय करून त्यातून पैसा कमवित होता आणि तरुण पिढीला नशेच्या खाईत ढकलत होता. परंतू परंडा पोलीसांनी आपल्या गोपनीय यंत्रणेला सक्रिय करून त्याच्याबाबत माहिती मिळवली आणि त्याच्यावर कारवाई करण्यामध्ये यशस्वी झाले. सदरील प्रकरणात पोलीस स्टेशन परंडा येथे 285/2023 कलम 8 (क), 20 (ब) ii (क), कलम 29 गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे अधिनियम 1985 अंतर्गत सहाय्यक पोलीस निरीक्षक कविता मुसळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार करीत आहेत. सदरील गुन्ह्यामध्ये घरातील राहणाऱ्या सर्व पाचही लोकांना आरोपी करण्यात आलेले असून आरोपींचे नाव संजय रामदास जाधव, बायडाबाई संजय जाधव, सूजराबाई रामदास जाधव, संतोष संजय जाधव आणि पूजा संतोष जाधव असे आहेत.

Follow us on social media:

सदरील कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ, पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक कविता मुसळे, पोलीस हवालदार दिलीप पवार, पोलीस नाईक काकडे, पोलीस नाईक गुंडाळे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश यादव, पोलीस कॉन्स्टेबल कोळेकर, पोलीस कॉन्स्टेबल अडसूळ, चालक सचिन लेकुरवाळे आणि सरगर यांनी पूर्ण केली.

संबंधित बातम्या

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
ग्रामीण

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

August 11, 2026
अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
ग्रामीण

अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन

August 8, 2026
दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
ग्रामीण

दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा

August 6, 2026
सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
ग्रामीण

सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब

August 1, 2026
अन विकासाचं पात फिरलं…
अर्थव्यवस्था

हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक

July 31, 2026
नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी
ग्रामीण

नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी

July 21, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
  • अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
  • दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
  • सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
  • हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!