• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Monday, September 28, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध📰 शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

धाराशिवच्या ज्योती क्रांती मल्टीस्टेट वर दरोडा पडला की पाडला ?

MH25News by MH25News
December 24, 2023
in अर्थव्यवस्था, क्राइम, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
धाराशिवच्या ज्योती क्रांती मल्टीस्टेट वर दरोडा पडला की पाडला ?
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव – वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या सुनील प्लाझामधील ज्योती क्रांती मल्टीस्टेट वर शनिवारी भर दिवसा दरोडा पडल्याची घटना घडली. सुनील प्लाझा मध्ये जवळपास ३० ते ४० दुकाने आहेत. वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या ज्योती क्रांती क्रेडिट सोसायटीवर शनिवारी भरदिवसा पडलेल्या दरोड्यामुळे पोलीसांसह शहरातील जनता चक्रावून गेली आहे. गैरव्यवहार आणि भ्रष्ट्राचार लपवण्यासाठी पतसंस्था कर्मचाऱ्यांनी दरोड्याचा बनाव तर केला नाही ना ? अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.

सुनील प्लाझामध्ये असलेल्या ज्योती क्रांती क्रेडिट सोसायटीवर शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पाच दरोडेखोरांनी दरोडा टाकून चार किलो सोने आणि १ लाख ४० हजार रुपये असा १ कोटी ८७ लाखाचा ऐवज लुटून नेल्याची तक्रार व्यवस्थापक सतीश फुटाणे यांनी आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.

पाच दरोडेखोर येतात, व्यवस्थापक सतीश फुटाणे यांना पिस्तूल दाखवतात आणि चार किलो सोने आणि १ लाख ४० हजार रुपये शांतपणे घेऊन जातात, हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असला तरी हा प्रकार दरोड्याचा वाटतच नाही.गैरव्यवहार आणि भ्रष्ट्राचार लपवण्यासाठी पतसंस्था कर्मचाऱ्यांनी दरोड्याचा बनाव तर केला नाही ना ? अशी शंका सर्व प्रकार बघितल्यानंतर वाटते.

Follow us on social media:

सुरुवातीला ५१ तोळे सोने गेले सांगणारे पतसंस्था कर्मचारी आता चार किलो सोने होते म्हणून सांगत आहेत. इतके सोने आले कुठून ? कोटींचा माल होता तर सुरक्षा रक्षक का ठेवला नाही ? दरोडेखोर आल्यानंतर आरडाओरड का केली नाही किंवा गेल्यानंतर आरडाओरड का केली नाही ? पिस्तूल लावल्यानंतर घाबरलेला किंवा भेदरलेला चेहरा वाटत नाही, तसेच सोने ठेवण्यासाठी तिजोरी होती का ? मग अलार्म का वाजला नाही, खातेदारांचा पैसा व ऐवजाची सुरक्षेची जबाबदारी बँकेची न्हवती का? दरोडा टाकून दरोडेखोर आरामात चालत जात असताना बँकेतील एकाही कर्मचाऱ्याने त्यांच्या मागे जाऊन आरडाओरडा का केला नाही? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. एकंदरीत प्रकार हा एकप्रकारे बनाव वाटत आहे. त्यामुळे “कूछ तो गडबड हैं!” अशी चर्चा सुरु आहे. त्यामूळे सदरील दरोडा हा इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी सुनियोजित रचलेले कुंभांड असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

एरव्ही पोलीस सोने चोरीची फिर्याद घेताना पावतीची विचारणा करतात , मग पतसंस्थेवला कोणता पुरावा मागितला ? पोलीसांचे हात ओले झाले का ? अशी शंका देखील व्यक्त केली जात आहे. फिर्यादीचा आरोपी निघण्याची शक्यता यानिमित्त व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026
धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
अर्थव्यवस्था

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

September 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!