• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, February 11, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?📰 धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग📰 धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी📰 सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ📰 तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले

MH25News by MH25News
June 16, 2025
in क्राइम, ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, संपादकीय
0
ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
0
SHARES
5.3k
VIEWS

पत्नी व दोन वर्षाच्या मुलाचा खून करून तरुणाची आत्महत्या

धाराशिव – धाराशिव तालुक्यातील बावी या गावात एका 29 वर्षीय तरुणाने ऑनलाइन गेममुळे कर्जबाजारी झाल्याच्या तणावातून स्वतःच्या पत्नी व दोन वर्षाच्या चिमुकल्याचा विष देऊन खून केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली असून या प्रकारामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.

लक्ष्मण मारुती जाधव असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता. अडीच वर्षांपूर्वी त्याने तेजस्विनी या तरुणीसोबत प्रेमविवाह केला होता. त्यांच्या दोन वर्षांचा एक चिमुकला मुलगा होता. लक्ष्मण हा गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाइन रम्मी या मोबाईल गेमच्या आहारी गेला होता. गेम खेळता खेळता त्याने लाखो रुपये गमावले. या आर्थिक नुकसानीतून सावरण्यासाठी त्याने स्वतःची एक एकर जमीन आणि गावातील प्लॉट विकला. तरीही त्याचे कर्ज फिटले नाही. त्यामुळे तो सतत मानसिक तणावात असल्याची चर्चा आहे.

Follow us on social media:

रविवारी रात्री त्याने पत्नी आणि मुलाला विष पाजून ठार मारले आणि त्यानंतर स्वतः घरात गळफास लावून आत्महत्या केली. सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घराचा दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला कळवले. पोलीस घटनास्थळी पोहोचताच दरवाजा फोडून आत शिरले. घरात तिघांचेही मृतदेह आढळले असून पोलिसांनी तत्काळ मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून पुढील तपास सुरू केला आहे.

घटनेची माहिती मिळताच धाराशिवच्या पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी घटनास्थळी भेट देऊन सविस्तर पाहणी करत संबंधित पोलीसांना सखोल तपासाचे आदेश दिले असून, ऑनलाइन रम्मीमुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक व मानसिक परिणामांवर अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

संबंधित बातम्या

धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?
ग्रामीण

धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?

February 10, 2026
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग
ग्रामीण

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग

February 10, 2026
भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात नगरपरिषद निवडणुकांत दमदार कामगिरी
ग्रामीण

धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी

February 9, 2026
सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ
ग्रामीण

सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ

February 4, 2026
तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
अर्थव्यवस्था

तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

February 2, 2026
तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे विरोधकांना घाम फोडणार?
ग्रामीण

तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे विरोधकांना घाम फोडणार?

February 2, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?
  • धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग
  • धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी
  • सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ
  • तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!