• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, February 11, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?📰 धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग📰 धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी📰 सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ📰 तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

कुस्तीच्या फडात “मल्लांना आसमान” दाखवणारा विकी चव्हाण “राजकीय आखाड्यात?”

MH25News by MH25News
October 14, 2025
in ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, राजकारण, संपादकीय
0
कुस्तीच्या फडात “मल्लांना आसमान” दाखवणारा विकी चव्हाण “राजकीय आखाड्यात?”
0
SHARES
1.5k
VIEWS

तेरखेडा गटातून विकी चव्हाणच्या नावाची जोरदार चर्चा

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली काढली ५५ जिल्हा परिषद गटाची आरक्षण सोडत

धाराशिव – मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या नियम २०२५ नुसार धाराशिव येथील जिल्हा परिषदेच्या कै.यशवंतराव चव्हाण सभागृह येथे जिल्हा परिषदेचे निवडणूक विभागनिहाय आरक्षण सोडत चिठ्ठ्या टाकून आयोजित सभेत निश्चित करण्यात आले

धाराशिव जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी एकूण ५५ निवडणूक विभाग आहेत.त्यापैकी ५० टक्के म्हणजे २८ जागा ह्या महिलांसाठी आरक्षित आहेत.यामध्ये अनुसूचित जातीच्या सदस्यांची संख्या ९ असून त्यापैकी ५ जागा ह्या महिला सदस्यांसाठी आरक्षित आहे. अनुसूचित जमातीसाठी १, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण १४ जागा असून त्यापैकी ७ महिलांसाठी आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण ३१ जागा असून त्यापैकी १६ जागा ह्या स्त्री सदस्यांसाठी राखीव आहे.

जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर होताच इच्छुकांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर आत्तापासूनच “विजयी भव:” “गुलाल आपलाच” “किंगमेकर” अशा सोशल मीडियावर पोस्ट सोडत वातावरण निर्मिती करताना दिसून येत आहेत.

Follow us on social media:

तेरखेडा गट हा सर्वसाधारण गटासाठी राखीव सुटल्याने विकी चव्हाण यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागली आहे. तेरखेडा गटातून विकी चव्हाण यांना संधी मिळावी अशी त्यांच्या मित्रमंडळींची इच्छा असून त्यांनी आत्तापासूनच सोशल मीडियावर जोरदार धमाका करण्यास सुरुवात केली आहे.

कोण आहे विकी चव्हाण?

तेरखेडा येथील विकी चव्हाण हे सर्व सामान्य घरातील एक व्यक्तिमत्व असून त्यांनी कुस्तीच्या फडात अनेक मल्लांना “आसमान” दाखवले आहे. सर्वसाधारण कार्यकर्ता अशी त्यांची ओळख असताना त्यांनी व्यावसायिक क्षेत्रामध्ये पाऊल ठेवत आपली ओळख निर्माण केली आहे तसेच दोस्तीचा दुनियेतील राजा माणूस म्हणून देखील त्यांची ओळख असून आज त्यांचा मित्रमंडळाचा मोठा वर्ग आहे. तसेच बड्या बड्या राजकीय मंडळींसोबत त्यांची उठ-बस असून त्यांची वेगळी ओळख आहे.

विकी चव्हाण यांना तेरखेडा गटातून संधी मिळाली तर ते राजकीय आखाड्यात देखील निश्चितच विरोधकांना चारी मुंड्या चित करत आसमान दाखवतील अशी आशा त्यांच्या मित्रमंडळी ला असून त्यांनी आत्तापासूनच ताकद लावण्यास सुरुवात केली असून येणाऱ्या काळात अनेक राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता असून त्या धर्तीवर “राजकीय फटाके” फुटलेले पहायला मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही

संबंधित बातम्या

धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?
ग्रामीण

धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?

February 10, 2026
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग
ग्रामीण

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग

February 10, 2026
भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात नगरपरिषद निवडणुकांत दमदार कामगिरी
ग्रामीण

धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी

February 9, 2026
सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ
ग्रामीण

सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ

February 4, 2026
तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
अर्थव्यवस्था

तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

February 2, 2026
तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे विरोधकांना घाम फोडणार?
ग्रामीण

तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे विरोधकांना घाम फोडणार?

February 2, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?
  • धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग
  • धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी
  • सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ
  • तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!