धाराशिव – पी. एम. कुसुम योजना, मुख्यमंत्री मागेल त्याला सोलर पंप असेल किंवा महावितरण विभागाच्या धोरण नसलेल्या कारभाराने शेतकऱ्यांचा आर्थिक फटका बसत आहे. तर कंपन्या मालामाल होत असल्याच आमदार कैलास पाटील यांनी म्हटले आहे. यासंदर्भात आयोजित बैठकीनंतर आ. पाटील पत्रकारांशी बोलत होते.कुसुम योजनेमध्ये आतापर्यंत सात हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत पण त्यातील तीन हजार तीनशेहुन अधिक शेतकऱ्यांना पैसे भरून व मुदत संपूनही सोलर पंप बसविलेला नसल्याच समोर आलं आहे. यामध्ये काम पूर्ण करताना शेतकऱ्यांना आर्थिक अडवणूक करणे, कामासाठी आवश्यक मुरूम, खडी आदी साहित्य आणायला लावणं असे प्रकार होत आहेत. साधारण 120 दिवसात नियमानुसार सोलर पॅनल बसवणे बंधनकारक आहे, अन्यथा एजन्सीकडून दंड वसूल करण्याची तरतूद आहे. अनेक प्रकरणात कामाच्या रक्कमेपेक्षा दंड अधिक असल्याच दिसून आले. मागेल त्याला सोलर पंप योजना तर निव्वळ धुळफेक ठरत असल्याच वास्तव आहे. यामध्ये 55 हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.

त्यातील तीन हजार अर्जाची छानणी झाली आहेत तर त्यातील सातशे शेतकऱ्यांकडून पैसे भरून घेण्यात आले आहेत. पैसे भरले असले तरीही अजून एजन्सीची निवडच केली नसल्याच निदर्शनास आले. यामुळे एकही सोलार पंप पैसे भरूनही मिळालेला नाही. निवडणुकी अगोदर घोषणा करून शेतकऱ्यांचे पैसे घेतले पण नंतरच वास्तव हे शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक केल्याचं दिसून येऊ लागलं आहे. जुन्या कनेक्शनला सोलर मध्ये हस्तांतरण करावयाचे असल्यास त्यांबाबत धोरण ठरल नसल्याच अधिकारी लोकांनी सांगितले. आर.डी एस.एस. योजनेची कामे देखील संथ गतीने सुरु आहेत. पंधरा महिन्यात फक्त 40 टक्केच कामे पूर्ण झाली आहेत आता जुनपर्यंत उर्वरीत 60 टक्के काम होतील का असा प्रश्न आमदार कैलास पाटील यांनी विचारला. तसेच ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्याबाबत आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.