धाराशिव जिल्ह्यातील घटनेने एकच खळबळ
कळंब – कळंब तालुक्यातील परतापूर येथे पुरण पोळी खाल्ल्याने 30 पेक्षा जास्त नागरिकांना विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
तीन दिवस अगोदर कळंब तालुक्यातील परतापुर गावात एका परिवाराकडून सुवासीनी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याठिकाणी जेवून झाल्यावर तीन तासांनी पुरण पोळी खाल्लेल्या नागरिकांना त्रास झाला त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले मात्र उपचार घेऊन त्रास कमी होत नसल्याने नागरिकांनी शासकीय रुग्णालयात प्रथमोपचार घेतले व त्या ठिकाणाहून सर्वांना आज 8 फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले आहे.
जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी 05:30 वाजल्यापासून रात्री 1 वाजेपर्यंत उपचारासाठी परतापूर येथील 30 नागरिकांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये 4 नागरिक अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. 30 पेक्षा जास्त नागरिकांना विषबाधा झाली असून यामध्ये काहींनी प्राथमिक उपचार घेतलें व त्यांना आराम मिळाला आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या नागरिकांमध्ये महिलांची संख्या जास्त असून पुरुषांना देखील विषबाधा झाली होती मात्र, त्यांनी प्राथमिक उपचार घेतल्याने त्यांना आराम मिळाल्याची माहिती रुग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांनी दिली आहे.
या घटनेची माहिती मिळताच धाराशिव – कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांनी त्या ठिकाणी भेट देऊन. रुग्णांची विचारपूस केली आहे तसेच योग्य उपचार करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. त्याचबरोबर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे व त्यांच्या पत्नी देखील या ठिकाणी उपस्थित राहून रुग्णांची विचारपूस करून रुग्णांना घाबरून न जाण्याचा दिलासा दिला आहे.
याबाबत सर्वांना विषबाधा कशामुळे झाली हे सर्वांचे रक्ताचे नमुने घेतले आहेत अहवाल आल्यानंतर माहिती मिळेल अशी माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. अति दक्षता विभाग उपचार घेणाऱ्या 4 रुग्णांची देखील परिस्थिती स्थिर आहे. अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.