• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, March 29, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन📰 सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

पंढरपूर-खामगाव बनला अपघात महामार्ग

MH25News by MH25News
May 29, 2024
in अर्थव्यवस्था, ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
पंढरपूर-खामगाव बनला अपघात महामार्ग
0
SHARES
2
VIEWS

महामार्गावरील कन्हेरवाडी पाटीवर राहिलेल्या अर्धवट काम आतापर्यंत गमविला 20 ते 25 जणांनी जीव

कधी सुरू होणार? आणखी किती जिव घेणार हा मार्ग?

कळंब – अमर चोंदे

Follow us on social media:

कळंब ते येरमाळा राष्ट्रीय महामार्गावरील कन्हेरवाडी पाटी जवळ अंदाजे 700 ते 800 मीटर रस्त्याचे काम काही अंतर्गत वादामुळे रखडलेला होता या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे या महामार्गावर आजपर्यंत 20 ते 25 व्यक्ती मयत झाले असून ,या ठिकाणी दररोज अपघात होतात या अपघातामुळे अनेक कुटुंबातील कर्त्या माणसाला जीव गमवावा लागला तर काहिजनांना कायमचे अपंगत्व आले आहे आता राहिलेल्या अर्धवट रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी आता धाराशिव पोलीस यंत्रणेसह रस्ते विकास महामंडळ व मेघा कंपनी ही जोरात कामाला लागली आहे अशी माहिती मिळाली आहे या रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे .या मागणीला धाराशिव चे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह कळंब पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी हिरवा कंदील दाखविला आहे त्यामुळे लवकरच अर्धवट रस्ता पूर्ण होण्याच्या अशा निर्माण झाल्या आहेत या राष्ट्रीय महामार्गाचे 2016 ते 20 17 मध्ये काम हाती घेण्यात आले होते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे शंभर फूट रस्ता असलेली नोंद असून हा मार्ग रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित केल्यानंतर जेवढे हस्तांतर झाले तेवढ्या जागेवर रस्ता करण्यात आला आहे परंतु कन्हेरवाडी पाटीवर काही अंतर्गत वादामुळे रस्त्याचे काम अडवण्यात आले होते .या अर्धवट रस्त्याच्या कामासाठी कन्हेरवाडी ग्रा.पच्या वतीने सरपंच ॲड.जाधव यांनी अनेकवेळा रस्ते विकास महामंडळ आणि मेघा कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेट व निवेदन देऊन प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, रस्ते विकास महामंडळ अधिकारी आणि रस्ता आडवणाऱ्यामध्ये नुकतीच बैठक झाली होती त्यामुळे रखडलेल्या अर्धवट रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. अशी माहिती कळंब पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवी सानप या रस्त्याच्या संदर्भात माहिती दिली आहे. दहा ते पंधरा दिवसात या रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे तरी आंदोरा, कन्हेरवाडी, मस्सा (खं) व इतर ग्रामस्थांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा पोलिस निरीक्षक रवि सानप व्यक्त केली आणि तसेच या रस्त्याचे काम एका बाजूने पूर्ण झाले असले तरी दुसऱ्या बाजूला रस्त्याचे काम अर्धवट राहिले आहे त्यामुळे त्या ठिकाणी मातीचे ढिगारे टाकण्यात आल्यामुळे रात्री अपरात्री या ठिकाणी अनेक गुन्हे चोऱ्या लुटमारी होत असून इतर प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

अधिक अपडेटस् साठी आमच्या फेसबूक पेजला फॉलो करा

मागच्या चार पाच दिवसाखालीच संध्याकाळी त्याच ढिगाऱ्यावर जाऊन एक पीव्हीसी पाईप भरुन घेऊन जाणारा टेंम्पो पलटी होऊन घर्षनाने त्या टॅंम्पोने पेट घेतला होता टॅंम्पोला लागलेली आग विझवण्याच्या ऐवजी त्या टेम्पोतील पाईप आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी व जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांनी सर्वच पाईप गायब करण्यात आले होते पण पोलिस निरीक्षक रवि सानप, साहाय्यक पोलीस निरीक्षक हणुमंत कांबळे,पोलिस उपनिरीक्षक रामहरी चाटे आणि त्यांच्या टिमने यांनी रातोरात अंधारात रानामळ्यात फिरुन शेतकऱ्यांचा शोध घेऊन जवळ जवळ सर्वच पाईप गोळा करून कंपनी मालकाला स्वाधिन करण्यात आले . चौकट. या कामांमध्ये जर कोणी अडथळा निर्माण केला तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांची गय केली जाणार नाही असे कळंब चे पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
ग्रामीण

आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

March 15, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!