• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Friday, July 4, 2025
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न📰 धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या📰 धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन📰 खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा📰 ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

भारताची कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धोबीपछाड! गोलंदाजांची जबरदस्त कामगिरी

MH25News by MH25News
June 10, 2024
in क्रीडा, देश-विदेश, संपादकीय
0
भारताची कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धोबीपछाड! गोलंदाजांची जबरदस्त कामगिरी
0
SHARES
1
VIEWS

टी20 विश्वचषक 2024 च्या 19व्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपारिक कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने होते. रविवारी (9 जून) न्यूयॉर्कमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतानं पाकिस्तानला 6 धावांनी धूळ चारली. या सामन्यात पाकिस्तानसमोर विजयासाठी अवघ्या 120 धावांचं माफक लक्ष्य होतं. मात्र त्यांना 20 षटकांत 7 गडी गमावून केवळ 113 धावा पर्यंतच मजल मारता आली. टी20 विश्वचषकाच्या इतिहासात भारताचा पाकिस्तानविरुद्ध 8 सामन्यांतील हा 7 वा विजय आहे.या सामन्यात भारतीय संघाच्या विजयाचे हिरो जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या हे ठरले. या दोघांनी आपल्या गोलंदाजीनं सामना फिरवला. एके काळी पाकिस्तानची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 72 धावा होती. मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन केलं. जसप्रीत बुमराहनं 4 षटकात अवघ्या 14 धावा देत 3 बळी घेतले. हार्दिक पांड्यानेही फखर जमान आणि शादाब खानला बाद करून त्याला चांगली साथ दिली. अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. अर्शदीपनं सामन्यातील शेवटचं षटक टाकलं, ज्यामध्ये पाकिस्तानला विजयासाठी 18 धावा करायच्या होत्या.तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. टीम इंडियानं दुसऱ्याच षटकात विराट कोहलीची विकेट गमावली. कोहली नसीम शाहच्या चेंडूवर 4 धावा करून पायचीत झाला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माही शाहीन आफ्रिदीच्या चेंडूवर आऊट झाला. रोहितनं 13 धावा केल्या. यानंतर डावखुरा फलंदाज अक्षर पटेल आणि रिषभ पंत यांनी तिसऱ्या विकेटसाठी 39 धावा जोडून डाव सांभाळला.

अधिक अपडेट्ससाठी आमच्या फेसबूक पेजला फॉलो करा

मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात अक्षरला नसीमनं बोल्ड केलं.अक्षर पटेल बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि रिषभ पंत यांच्यात चांगली भागीदारी झाली. एकेकाळी भारताची धावसंख्या 3 गडी बाद 89 धावा होती आणि संघाला या खेळपट्टीवर चांगली धावसंख्या उभारण्यात यश मिळेल असं वाटत होतं. मात्र पाकिस्तानी गोलंदाजांनी शानदार पुनरागमन करत भारताला एकापाठोपाठ एक धक्के दिले. भारतानं 30 धावांत 7 विकेट गमावल्या.भारतीय संघ केवळ 19 षटके खेळू शकला आणि 119 धावा केल्या. रिषभ पंतनं सर्वाधिक 42 धावांची खेळी खेळली. त्यानं 31 चेंडूच्या आपल्या खेळीत 6 चौकार हाणले. अक्षर पटेलनं 18 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 20 धावा केल्या. पाकिस्तानकडून हरिस रौफ आणि नसीम शाहनं प्रत्येकी 3 बळी घेतले. तर मोहम्मद आमिरला 2 विकेट मिळाल्या.

संबंधित बातम्या

कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न
ग्रामीण

कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न

July 2, 2025
धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या
क्राइम

धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या

June 30, 2025
धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन
अर्थव्यवस्था

धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन

June 27, 2025
खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा
आरोग्य

खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा

June 26, 2025
ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
क्राइम

ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले

June 16, 2025
इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा
क्राइम

इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा

June 13, 2025

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न
  • धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या
  • धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन
  • खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा
  • ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!