• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Tuesday, February 10, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?📰 धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग📰 धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी📰 सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ📰 तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

जळकोट येथील महिलेच्या खुन प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने लावला छडा

MH25News by MH25News
November 24, 2025
in क्राइम, ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
जळकोट येथील महिलेच्या खुन प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने लावला छडा
0
SHARES
36
VIEWS

धाराशिव – नळदुर्ग हद्दीतील जळकोट येथे सुभद्रा रामशेटटी पाटील (वय ६०) वर्षे (रा.जळकोट) या वृद्ध महिलेचा दि.२१ रोजी तिच्या राहत्या घरी अज्ञात व्यक्‍तीने खुन करून अंगावरील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती. या खुनाचा गुन्हा नळदुर्ग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला होता.

प्रथमदर्शनी सदर गुन्हा कोणी केला याबाबत पुरावे उपलब्ध नसल्याने गुन्ह्याचा छडा लावणे हे पोलीसांसमोरील मुख्य आव्हान होते. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधिक्षक रितू खोखर यांनी तातडीने स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव यांना तात्काळ सदर गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते. त्या अनुशंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सह पोलीस निरिक्षक सुदर्शन कासार व पथक यांनी तात्काळ सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देवून गुन्हा उघडकीस आणण्याच्या दुष्टीकोनातुन पुरावे गोळा करण्यास सुरूवात केली. तसेच गुन्ह्या बाबत गोपनीय माहिती मिळवण्यास सुरूवात केली. पोलीसांच्या प्रयत्नांना यश आले आणि तांत्रिक माहितीच्या आधारे एक महिला संशयितरीत्या घटनास्थळाच्या आजूबाजूला फिरत असल्याचे दिसून आले. सदरील महीला कोण आहे याबाबत अधिक माहिती घेतली असता सदर महिला याच परीसरात राहणारी वनिता झुंबर सुरवसे ही असल्याचे समजले. त्यावरून नमुद महिलेच्या मुलाकडे तिच्याबाबत चौकशी केली असता ती उपचारकामी ससुन रूग्णालय, पुणे येथे गेली असल्याचे त्याने सांगितले. त्यारून एक पथक नमुद महिलेचा शोध घेण्यासाठी पुणे येथे पाठविण्यात आले त्यादरम्यान ती भिगवण येथे राहत असलेल्या तिच्या मुलीकडे असल्याबाबत माहिती मिळाली. त्या ठिकाणावरून त्या महिलेला ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडे सविस्तर चौकशी केली असता तीने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, विश्‍वासात घेवून विचारले असता महिलेने गुन्हा केला असल्याची कबुली दिली. आरोपी महिलेस खून करण्यामागचा उद्देश विचारला असता तिने सांगितले की, मयत महिलेकडून आरोपी महिलेने दागिने गहाण ठेवून ४०,००० रू उसणे घेतले होते आणि त्या मुददयावरून मयत महिला हि सतत त्रास देत होती. त्या गोष्टीचा राग मनात धरून आरोपी महिलेने सुभद्रा पाटील हिचा खुन केला आणि तिच्या अंगावरील दागिने काढून पुणे येथे पळून गेली होती. सदरील आरोपी महिला वनिता झुंबर सुरवसे (रा.जळकोट ता.तुळजापूर जि धाराशिव) हिला पुढील तपासासाठी पोलीस ठाणे नळदुर्ग यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Follow us on social media:

सदरची कामगिरी रितू खोखर, पोलीस अधिक्षक धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, शौकत पठाण, जावेद काझी, फरहान पठाण, प्रकाश औताडे, चालक सुभाष चौरे, रत्नदिप डोंगरे, नागनाथ गुरव यांच्या पथकाने केली आहे.

संबंधित बातम्या

धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?
ग्रामीण

धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?

February 10, 2026
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग
ग्रामीण

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग

February 10, 2026
भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात नगरपरिषद निवडणुकांत दमदार कामगिरी
ग्रामीण

धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी

February 9, 2026
सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ
ग्रामीण

सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ

February 4, 2026
तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
अर्थव्यवस्था

तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

February 2, 2026
तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे विरोधकांना घाम फोडणार?
ग्रामीण

तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे विरोधकांना घाम फोडणार?

February 2, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?
  • धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग
  • धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी
  • सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ
  • तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!