भाजपचे सुधीर घोलप यांच्या पाठपुरावाला मिळत आहे यश तक्रारींवर संबंधित विभाग करत होते दुर्लक्ष शेवटी दखल घेतली पण पुढे कारवाई होणार का? कारवाई नाही झाल्यास कोर्टात धाव घेणार
वाशी – वाशी तालुक्यातील कडकनाथवाडी येथील साठवण तलाव क्रमांक २ चे काम झाल्यापासून या साठवण तलावास मोठी गळती लागली आहे. तलावातून रोज लाखो लिटर पाणी वाया जात असून संबंधित विभागाचे गेली अनेक वर्षे झाली याकडे दुर्लक्ष आहे. काम पूर्ण होताच तलावाला मोठी गळती लागल्याने ठेकेदाराच्या आणि अधिकाऱ्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. शासन एकीकडे म्हणतं पाणी आडवा पाणी जिरवा आणि दुसरीकडे खराब दर्जाची कामे करून पाण्याची नासाडी केली जात. कडकनाथवाडी तलाव दोन हा साठवण तलाव असून यात पाणी साठण्याऐवजी पाणी वाहून जात असल्याने शासनाचा उद्देश निष्फळ ठरत आहे. सध्या कडाक्याचा उन्हाळा सुरू झाला आहे. गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या बोर, विहीर, तलावाची पाणी पातळी गाठली आहे. जिल्ह्यातील बहुतांश गावात पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. नागरिकांची पिण्याच्या पाण्याची टँकर सुरू करण्याची मागणी असताना शासनाकडून व्यवस्था केली जात नाही. तर दुसरीकडे कडकनाथवाडी साठण तलावातून ऐन उन्हाळ्यात नदी सारखे पाणी रोज ओसंडून वाहत वाया जात आहे.
तलाव बांधण्यासाठी शासने करोडो रुपये खर्च केले आहेत. विशेष म्हणजे मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती सुधारण्यासाठी कृष्णा खोऱ्याचे पाणी लिफ्ट इरिगेशन मार्फत याच साठवण तलावात येणार आहे. भल्यामोठ्या पाईपलाईन करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी शासने हजारो कोटी रुपये बजेट उपलब्ध करून दिले आहे. शासनाच्या तिजोरीवर आर्थिकचा मोठा भार देखील पडला आहे. परंतु कृष्णा खोऱ्याचे पाणी येणे अगोदरच या साठवून तलावाला मोठी गळती लागली असल्याने शासनाचे करोडो रुपये पाण्यात जाण्याची शक्यता स्थानिकच्या वस्तू स्थितीवरून नाकारता येत नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्यासाठी जी महत्वाची योजना सुरू केली यात या तलावाचा समावेश करण्यात आला आहे. २०१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ आढावा बैठकीत या तलावाचा आढावा त्यांनी घेतला होता. आणि त्याचा तलावाची अशी दुर्दशा आहे. कडकनाथवाडी साठवण तलावाच्या गळतीच्या अनुषंगाने भाजपचे वाशी तालुका सरचिटणीस सुधीर घोलप यांचा गेली अनेक वर्ष झाली संघर्ष सुरू आहे. संबंधित विभागाकडे त्यांनी अनेकदा पत्रव्यवहार करून कारवाईची मागणी केली आहे. ठेकेदाराने तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे करून तलावात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे,यासाठी वेळोवेळी शासनदरबारी पायपीट करत शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजवल्या आहेत. तरीदेखील ठोस अशी कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. तलावात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्यामुळेच एकमेकांना वाचवण्यासाठी प्रयत्न आहेत. म्हणून तर कारवाई होत नसल्याचे घोलप यांचे म्हणणे आहे. पण पाषाणासारखे घट्ट असलेल्या अधिकाऱ्यांना तलावातून वाया जात असलेले पाणी व जनतेचे हाल दिसत नाहीत का? संबंधित विभागाने पत्र व्यवहार करत गेली अनेक वर्षे झाली फक्त वेळकाढूपणा केल्याचे तक्रादर घोलप यांनी सांगितले.
शेवटी पाषाणाच्या दगडासारखे घट्ट असलेले अधिकारी मुरमाच्या खड्याप्रमाणे थोडे नरम झालेले. १५ एप्रिल रोजी संबंधित विभागाकडून भाजपचे तालुका सरचिटणीस सुधीर घोलप यांना फोन करून तलाव गळतीच्या अनुषंगाने आम्ही पावले उचलली आहेत,असे सांगण्यात आले. केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन केंद्र (CWPRS) यांच्या उच्चस्तरीय तपासणी टीम या कडकनाथवाडी तलावावरती येत आहेत. याचा पहिला एक भाग म्हणून पाणी ज्या ठिकाणातून वाया जात आहे,त्या ठिकाणच्या तपासण्या चालू केल्या आहेत,असे देखील अधिकाऱ्यांनी सांगितले. तलाव गळतीच्या ठिकाणी मोठ्या यंत्रणा आल्या असल्याने तलावात खरच करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे का? अशी चर्चा आता परिसरातील नागरिकांत रंगू लागली आहे.
“ठेकेदाराने तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे करून शासनाची जनतेची फसवणूक केली आहे. तलावाचे काम चांगले झाले असते, तर अधिकाऱ्यांनी तपासणी यंत्रणा आणल्या नसत्या आलेल्या तपासणी यंत्रणावरून लक्षात येते तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे व करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. संबंधित सर्व अधिकारी यात सामील असून एकमेकांना वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अधिकाऱ्यांनी ठेकेदारचे लायसन्स काळ्या यादीत टाकावे, झालेल्या नुकसानीची भरपाई घ्यावी, यात सामील असलेल्या सर्वांवर कारवाई करावी. आमचे लाडके नेते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा कडकनाथवाडी साठण तलाव हा महत्वाचा प्रकल्प आहे. त्यामुळे कारवाई नाही झाल्यास कोर्टात धाव घेणार आहे.”
– सुधीर घोलप
भाजप वाशी तालुका सरचिटणीस
“आम्ही कारवाईला सुरवात केली आहे. सोमवार, मंगळवार तक्रादार यांनी वेळ काढून तलावाच्या ठिकाणी उपस्थित राहून चर्चा करत आपल्या शंकेची निवारण करावे. तलाव दुरुस्त करण्यासाठी जो काय लाख किंवा कोटी रुपये खर्च येईल तो ठेकेदाराकडून वसूल करण्यात येईल.”
:- डेप्युटी इंजिनियर घुले
कृष्णा मराठवाडा बांधकाम विभाग क्रमांक १ धाराशिव