• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, March 28, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन📰 सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

भाजपा व आय.एम.ए.संघटना यांच्यातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर.

MH25News by MH25News
October 11, 2025
in आरोग्य, ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
भाजपा व आय.एम.ए.संघटना यांच्यातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर.
0
SHARES
526
VIEWS

डॉ.अनंत मुगळे यांची भाजपा जिल्हास्तरीय वैद्यकीय सेल संयोजक पदी निवड.

स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजपाला फटका बसण्याची शक्यता ?

धाराशिव – उमरगा शहरातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ.अनंत मुगळे यांची भाजपाच्या वैद्यकीय सेल जिल्हा संयोजक पदी नुकतीच निवड झाली आहे. यामुळे शिंदे सेनेसह भाजपच्या जुन्या गटाला धक्का बसला आहे. परंतु या निवडीवरून शहरासह तालुक्यात अनेक चर्चांना उधाण आले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे डॉ.अनंत मुगळे हे राजकारणात सक्रिय जरी नसले तरी ते माजी खासदार रवींद्र गायकवाड व माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांचे अत्यंत जवळचे निकटवर्तीय असल्याचे विख्यात आहे. ही निवड करताना भाजपच्या जुन्या गटाला विश्वासात घेतले नसल्याचे भाजपचे मूळ कार्यकर्त्यांकडून खाजगीत बोलले जात आहे. मुळात उमरगा येथील प्रसिद्ध डॉ.चंद्रकांत महाजन हे पूर्वीपासून भाजपचे सक्रिय कार्यकर्ते व नेते आहेत. जिल्हास्तरीय वैद्यकीय सेलच्या महत्त्वाच्या पदावर त्यांची निवड होणे अपेक्षित होते परंतु असे झाले नाही. या सर्व घडामोडीचा विचार करता भाजप मध्ये शह कटशह याचे राजकारण तर होत नाही ना याबाबत कुजबुज सुरू आहे.

आय.एम.ए. संघटनेतील अंतर्गत कलह व आगामी नगरपरिषद अध्यक्ष पदाचा उमेदवार..

Follow us on social media:

उमरगा नगर परिषदेच्या आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी उमरगा नगर परिषदेचे अध्यक्ष पद सर्वसाधारण पदासाठी जाहीर झाले आहे. या पार्श्वभूमीवर उमरगा येथील प्रसिद्ध डॉ.उदय मोरे यांचे आय.एम.ए. संघटनेतील एका गटाने नाव पुढे केले आहे. तसेच भाजपा कडून युवा नेते हर्षवर्धन चालुक्य यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून नाव पुढे आले आहे. यांना शह देण्यासाठीच तर आय.एम.ए.संघटनेच्या एका गटाकडून व भाजपच्या एका गटाकडून अचानक पणे डॉ.अनंत मुगळे यांचे नाव पुढे आणले नाही ना याबाबतही चर्चा सुरू आहे.

डॉक्टरांना राजकीय आश्रयाची गरज भासत का आहे?

उमरगा शहर हे मागील अनेक वर्षापासून वैद्यकीय सेवा देण्यासाठी प्रसिद्ध आहे. मागील कित्येक वर्षापासून उमरगा परिसरातीलच नव्हे तर शेजारील कर्नाटक राज्यातील रुग्ण मोठ्या प्रमाणात वैद्यकीय उपचारासाठी उमरगा येथे येत असतात. उमरगा शहरातील अनेक नामांकित डॉक्टर त्यांना चांगल्या दर्जाची वैद्यकीय सेवा माफक देत असत. परंतु मागील काही वर्षापासून नवीन नवीन लोकांची या क्षेत्रात भर पडली असून त्यांच्याद्वारे वैद्यकीय सेवेचे बाजारीकरण झाले आहे. यातील काही जणांनी वैद्यकीय सेवा देताना सेवाभाव न ठेवता सामाजिक भान विसरून व्यावसायिक दृष्टिकोनातून प्रचंड माया जमवली आहे. तसेच त्यांच्या रुग्णालयात चुकीच्या उपचारामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचे रुग्णालयात होणाऱ्या भांडणांचे अनेक घटना होत आहेत. विशेषतः या मंडळींकडून सामाजिक भान किंवा जाण ठेवली जात नसल्याबाबत सर्वसामान्य जनतेत या क्षेत्राविषयी कमालीची चिड निर्माण झाली आहे. त्यामुळेच कुठेतरी या लोकांना राजकीय आश्रयाची गरज भासत नाही ना असा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील विधानसभा निवडणुकीतही उमरगा शहरातील वैद्यकीय सेवा देणाऱ्या काही मंडळींनी मैत्री व जातीय समीकरणाच्या आधारावर आमदार प्रवीण स्वामी यांना मदत केल्याची अनेक जण चर्चा करतात.

संबंधित बातम्या

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
ग्रामीण

आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

March 15, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!