वाशी – वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे उपडाकघर (पोस्ट ऑफिस) नवीन उघडण्यात आले असून या उपक्रमाचा शुभारंभ जिल्ह्याचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्या हस्ते शनिवारी ( दि.१० मे) रोजी करण्यात आला.
या कार्यक्रमाला ए.के.शेख सहायक डाक निदेशक (छ. संभाजीनगर), संजय आंबेकर (डाक अधीक्षक, धाराशिव), दिलीप घोलप सरपंच, प्रशांत बाबा चेडे, रणजीत पाटील, तात्या गायकवाड, कांतीलाल बोराणा, शंकर जाधव, उद्धव साळवी, रईस भाई मुजावर, संजय होळे उपस्थित होते. त्याचबरोबर डाक विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा उपक्रम म्हणजे ग्रामीण भागात सरकारच्या सेवा पोहोचवण्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना पाठवलेल्या पत्रांमधून आणि सतत पाठपुराव्याच्या माध्यमातून या दोन्ही पोस्ट ऑफिसचे स्वप्न पूर्ण करता आले.
पोस्ट ऑफिसमधून ग्रामस्थांना खालील सुविधा गावातच मिळणार आहेत
• सर्व डाक योजना लाभ
• डीबीटी फॉर्म भरून थेट खात्यात पैसे
• सुकन्या योजना, विमा योजना
• ५४९ रुपयांमध्ये १० लाखांचा विमा कवच
• आधार दुरुस्ती सुविधा यामुळे ग्रामीण भागातील अनेक अडचणींवर थेट गावातूनच तोडगा मिळणार आहे
अधिक अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा
धाराशिवसाठी स्वतंत्र डाक विभाग मिळावा यासाठी लवकरच अधिकृत पाठपुरावा करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी दिली