तुळजापूर – विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इच्तुछुक उमेदवारांनी आपल्या खिशात तिकीट पाडून घेण्यासाठी आपापल्या परीने फिल्डींग लावण्यास सुरू केली असून. इच्छुक उमेदवार पायाला भिंगरी लावून पळताना दिसत आहेत.
एकीकडे उमेदवार तिकिटासाठी धडपड करत असताना तुळजापूर तालुक्यात चर्चा आहे ती अपक्ष उमेदवार अपक्ष उमेदवार अण्णासाहेब दराडे यांची. दराडे हे गेल्या महिनांभरापासून तुळजापुर मतदार संघात गाव भेटी दौऱ्यावर असून चित्ररथ दौऱ्याच्या माध्यमातून त्यांनी मतदारांच्या समस्या जाणून घेत गाव भेट दौरा सुरू केला आहे.

तुळजापूर मतदार संघामध्ये इच्छुक उमेदवारांची गर्दी दिसून येत आहे त्यात शेतकरी पुत्र अपक्ष उमेदवार अण्णासाहेब दराडे हे निवडणूक रिंगणात उतरणार हे जवळपास निश्चित असून प्रस्थापित राजकारण्यांना दराडे हे तगडी फाईट देणार अशी चर्चा रंगू लागली आहे. शेतकरी पुत्र अण्णासाहेब दराडे यांनी गेल्या दोन महिनाभरापासूनच गाव भेट दौऱ्याला सुरुवात देखील केली आहे. ते मतदार संघातील प्रत्येक गाव खेड्यापर्यंत जाऊन जनतेशी संवाद साधत आहेत. त्यांच्या या दौऱ्याला कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे. शेतकरी पुत्रच आमदार का असावा? याचे महत्व ते जनतेला पटवून देत आहेत. ते ज्या पद्धतीने मांडणी करत आहेत ते जनतेला खूपच भावत आहे, जनतेच्या मनात घर करत आहे. यातून विधानसभेचे मैदान मारण्यासाठी शेतकरी पुत्र दराडे यांनी चांगलीच कंबर कसल्याचे दिसून येत आहे. यामुळं अनेक प्रस्थापित नेत्यांचं टेन्शन वाढल्याचं बोललं जात आहे. दराडे यांनी आपल्या प्रचार दौऱ्यात यापूर्वीच्या राजकारण्यांनी आपल्या मतदार संघात काय कामं केली? मतदारांवर कसा अन्याय झाला, कोणते उद्योग धंदे उभे केले? ईअनेक मुद्द्यांसह सामान्य लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडून बदल घडवण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन मतदारांना केले असून मतदार संघात बदल झाला तरच आपला विकास होणार असून ज्या-ज्या प्रस्थापित राजकारण्यांनी तुळजापूर तालुका मागास ठेवला अश्या लोकांना चपराक बसणार असल्याचे ठणकावून सांगितले. त्यामूळे शेतकरी पुत्र अण्णासाहेब दराडे हे सामान्य लोकांच्या भावना जाणून हेच आपल्या समस्या सोडवू शकतात अशी जोरदार चर्चा तुळजापूर मतदार संघात रंगू लागली आहे.