• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Friday, July 4, 2025
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न📰 धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या📰 धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन📰 खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा📰 ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

धाराशिव शहरात रस्त्यावरील खड्डयाने घेतला तरुणाचा बळी

MH25News by MH25News
October 18, 2024
in ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
धाराशिव शहरात रस्त्यावरील खड्डयाने घेतला तरुणाचा बळी
0
SHARES
300
VIEWS

आक्रमक शिवसैनिकांचा साबां विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना घेराव

एका बळीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग; तात्काळ डागडुजीला सुरुवात

धाराशिव – रस्त्यांवरील खड्डयांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेली डोळेझाक एका तरुणाचा बळी घेऊन गेली आहे. गुरुवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावर ही दुर्घटना घडली. ओंकार जाधवर असे मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आक्रमक भूमिका घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालून रस्त्यावरील खड्डयांबाबत जाब विचारुन धारेवर धरले. रस्त्याची डागडुजी करण्यासाठी कार्यारंभ आदेश निघालेला असताना अधिकार्‍यांकडून दखल घेतली न गेल्यामुळे एका तरुणाला जीव गमवावा लागला. आणखी किती बळी तुम्ही घेणार आहात? असा सवाल करुन कार्यकारी अभियंत्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी या घटनेनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली. एकजणाचा बळी गेल्यानंतर खडबडून जाग आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ रस्त्याच्या डागडुजीला सुरुवात केली आहे.

धाराशिव शहरातील राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भवानी चौक या मार्गावर खड्डयांचे साम्राज्य आहे. त्यामुळे नागरिकांना या मार्गावरुन प्रवास करताना दररोज जीवघेणी कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या मार्गाची डागडुजी करण्याबाबत एका कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश देखील दिलेले आहेत. परंतु या कामाकडे कार्यकारी अभियंत्यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच दुचाकीवरुन जाणार्‍या तरुणाचा बळी गेला. या दुर्घटनेला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना जबाबदार धरत शिवसैनिकांनी घेराव घालून रस्त्यावरील खड्डयांबाबत जाब विचारला. तसेच कार्यकारी अभियंत्यांना दुचाकी वाहनावर बसवून रस्त्यांची झालेली दुरवस्था निदर्शनास आणून दिली. तसेच रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईपर्यंत कार्यकारी अभियंत्यांना जागेवरुन हलू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत अभियंत्यांना खड्डयामध्ये बसवून ठेवण्याचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी दिला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तात्काळ खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे खड्डयांनी त्रस्त झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी एकाचा बळी जाण्याची वेळ सार्वजनिक बांधकाम विभागामुळे आली असल्याची भावना नागरिकांमधून होत आहे.

यावेळी माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, नितीन शेरखाने, बाळासाहेब काकडे, राणा बनसोडे, पंकज पाटील, अमित उंबरे, सह्याद्री राजेनिंबाळकर, गणेश साळुंके, अजिंक्य राजेनिंबाळकर, गणेश राजेनिंबाळकर, सतीश लोंढे, संदीप शिंदे, जगदीश शिंदे, हनुमंत देवकते, गणेश आसलेकर, महेंद्र शिंदे, मुन्ना पाटील, हर्षद ठवरे, संकेत सूर्यवंशी, लक्ष्मण जाधव, मुकेश चौगुले, आश्रुबा मुंडे व इतर शिवसैनिक उपस्थित होते.

रस्त्याची दुरवस्था झाल्याची अभियंत्यांकडून कबुली

शिवसैनिकांनी थेट घटनास्थळी आणून खड्डयांमुळे झालेली दुरवस्था निदर्शनास आणून दिल्यानंतर रस्त्याची दुरवस्था झाली असल्याची कबुली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चव्हाण यांनी दिली. पावसामुळे खडी वाहून गेल्याने दुरवस्था झाली असल्याचे सांगून खड्डयामुळे तरुणाचा जीव गेल्याच्या घटनेला जबाबदार कोण? याबाबत मात्र भाष्य करणे त्यांनी टाळले.

संबंधित बातम्या

कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न
ग्रामीण

कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न

July 2, 2025
धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या
क्राइम

धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या

June 30, 2025
धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन
अर्थव्यवस्था

धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन

June 27, 2025
खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा
आरोग्य

खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा

June 26, 2025
ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
क्राइम

ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले

June 16, 2025
इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा
क्राइम

इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा

June 13, 2025

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न
  • धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या
  • धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन
  • खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा
  • ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!