श्रीकांत शिंदे यांच्यासोबत मुंबईतील बैठकीत धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आवळला सूर
धाराशिव जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या जिल्हा पदाधिकार्यांची बैठक
धाराशिव – आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षातून बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. मागील आठवड्यात मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये धाराशिव येथे भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना त्यांनी युती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये युती झाली तर ठीक अन्यथा भाजप पक्ष स्वबळावर लढण्यास तयार आहे असं वक्तव्य केलं होतं. काल परवा परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे धाराशिव जिल्ह्यामध्ये आले असता त्यांनी देखील जयकुमार गोरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना पक्ष देखील हाच विचार करणार असल्याचे बोलून दाखवले होते. यामुळे महायुतीतील धूसपूस चव्हाट्यावर आल्याचे पहयला मिळाले.
दरम्यान धाराशिव जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व जिल्हा पदाधिकार्यांची बैठक मुंबई येथे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये काल (दि.१६) रोजी पार पडली. या बैठकीमध्ये धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी सन्मानपूर्वक युती झाली तर ठीक, अन्यथा आपण देखील स्वबळावर लढले पाहिजे असा कार्यकर्त्यांनी सूर आवळल्याची चर्चा रंगू लागली आहे.
आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे आरक्षण जाहीर होताच इच्छुक उमेदवारांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे त्याचबरोबर पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे निवडणुकीची रणनीती आखण्याबाबत देखील चर्चा सुरू केली आहे. शक्य झाले तर युतीमध्ये अन्यथा स्वभावावर लढू असा नारा कार्यकर्त्यांनी दिल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे महायुतीतील पक्ष युतीमधून निवडणुका लढतील की स्वबळाचा मार्ग अवलंबतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे











