वाशी – वाशी तालुक्यातील तेरखेडा, वाशी, पारगाव, पारा या चारही मंडळात जून 2024 ते डिसेंबर 2024 या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये अतिवृष्टी झाली होती. यासाठी शासन स्तरावर नुकसान भरपाई मागणी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर नुकसान भरपाई प्रस्ताव शासनाकडून मंजूर झाला असून लवकरच वाशी तालुक्यातील चारही मंडळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा होणार आहे. यासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या मोबाईल नंबर ची आवश्यकता आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या गावातील तलाठी कार्यालयामध्ये तलाठ्याकडे मोबाईल नंबर द्यावेत असे आवाहन वाशी चे तहसीलदार प्रकाश म्हेत्रे यांनी केले आहे. शुक्रवारी (दि.10) रोजी सर्व तलाठ्यांना आपापल्या गावातील तलाठी सज्जामध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना तहसीलदार म्हेत्रे यांनी दिल्या आहेत.