• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Friday, July 4, 2025
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न📰 धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या📰 धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन📰 खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा📰 ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

सोयाबीन विक्रीच्या नोंदणीसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

MH25News by MH25News
November 17, 2024
in कृषी, ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
नळदुर्ग अप्पर तहसील कार्यालयास उच्चस्तरीय समितीची मंजुरी
0
SHARES
38
VIEWS

शेतकऱ्यांनी नोंदणी करावी – आमदार राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव – बारदान्याचा तुटवडा निर्माण झाल्याने सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब झाला. आता अडचणी दूर झाल्या आहेत. खरेदीला गती आली आहे. खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब झाल्यामुळे नाव नोंदणीचा कालावधी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे सोयाबीन विकण्याची घाई न करता 30 नोव्हेंबरपर्यंत शेतकरी बांधवांनी खरेदी केंद्राकडे नोंदणी करावी. सोयाबीन खरेदीनंतर अवघ्या चार दिवसांत प्रतिक्विंटल चार हजार 892 रुपयांप्रमाणे पेमेंट खात्यात जमा केले जात आहे. शनिवारपर्यंत 60 लाखाहून अधिक रूपये शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्गही करण्यात आले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

धाराशिव जिल्ह्यातील 17 हमीभाव खरेदी केंद्रांवरून सोयाबीन खरेदी सुरू झाली आहे. सुरूवातीच्या काळात सोयाबीनचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे खरेदी प्रक्रियेत विलंब निर्माण झाला होता. फेडरेशनकडे पाठपुरावा करून बारदाना निविदा प्रक्रिया तातडीने राबवून जिल्ह्यासाठी आवश्यक असलेला बारदाना उपलब्ध करून घेतला आहे. हमीभाव केंद्रांवर खरेदी प्रक्रियेला आता गती आल्यामुळे खुल्या बाजारात सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी सोयाबीन विकण्याची घाई न करता नोंदणीसाठी दिलेल्या पुढील 10 दिवसांच्या मुदतवाढीचा उपयोग करून घ्यावा. बारदाना मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर सोयाबीन खरेदी खरेदीला मोठी गती मिळत असल्याचे दिसून येत आहे. ज्या शेतकर्‍यांनी फेडरेशनकडे नोंदणी केलेली नाही, त्यांनी तातडीने नोंदणी करून सोयाबीन खरेदी केंद्रावरच सोयाबीनची विक्री करावी, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.

जिल्ह्यातील भूम, दस्तापूर, गुंजोटी, ईट, नळदुर्ग, कळंब, वाशी, उमरगा, धाराशिव, सोन्नेवाडी, चिखली, शिराढोण, टाकळी बें, तुळजापूर, कानेगाव, कनगरा, चोराखळी आदी 17 ठिकाणी खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. आतापर्यंत 12 हजार 100 शेतकर्‍यांनी फेडरेशनकडे नोंदणी केली असून 320 शेतकर्‍यांच्या सात हजार 300 क्विंटल सोयाबीनची खरेदी पूर्ण झाली आहे. त्यापैकी 60 शेतकर्‍यांच्या खात्यावर बाराशे क्विंटल सोयाबीन खरेदीपोटी 60 लाखाहून अधिक पेमेंट जमा झाले आहे. यापूर्वी नोंदणीसाठी 15 नोव्हेंबर ही मुदत देण्यात आली होती. मात्र अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे नोंदणीसाठी मुदतवाढ करण्यात यावी, यासाठी आपण आग्रही मागणी केली होती. त्यानुसार 30 नोव्हेंबरपर्यंत नोंदणीचा कालावधी वाढविण्यात आला आहे. जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी सोयाबीन विक्री करण्याची घाई न करता लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी, असे आवाहनही आमदार पाटील यांनी केले आहे.

चार दिवसात पेमेंट खात्यात जमा

यापूर्वी हमीभाव खरेदी केंद्रात विक्री केलेल्या सोयाबीनचे पैसे मिळावेत, यासाठी चकरा माराव्या लागत होत्या. मात्र आता चार दिवसांच्या आत शेतकर्‍यांच्या खात्यावर सोयाबीनचे पैसे जमा होत आहेत. दस्तापूर व धाराशिव केंद्रावर सोयाबीन विक्री केलेल्या शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर 60 लाख 97 हजार रूपये जमा करण्यात आले आहेत. खरेदी केंद्रावर 12 टक्के आर्द्रतेचा निकष आहे. वाहतूक खर्चाचे नुकसान टाळण्यासाठी सोयाबीन हमीभाव केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी नेण्यापूर्वी आर्द्रतेची तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न
ग्रामीण

कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न

July 2, 2025
धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या
क्राइम

धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या

June 30, 2025
धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन
अर्थव्यवस्था

धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन

June 27, 2025
खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा
आरोग्य

खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा

June 26, 2025
ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
क्राइम

ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले

June 16, 2025
इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा
क्राइम

इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा

June 13, 2025

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न
  • धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या
  • धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन
  • खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा
  • ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!