• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, March 28, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन📰 सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

धारशिवच्या १४० कोटींच्या रस्ते विकास कार्यादेशाला तूर्त स्थगिती?

MH25News by MH25News
October 28, 2025
in अर्थव्यवस्था, ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
धारशिवच्या १४० कोटींच्या रस्ते विकास कार्यादेशाला तूर्त स्थगिती?
0
SHARES
914
VIEWS

धाराशिवकर ठरले पुन्हा एकदा “राजकीय खेळीचे बळी”?

धाराशिव – धाराशिव शहरातील तब्बल १४० कोटी रुपयांच्या रस्ते विकास प्रकल्पाला राजकीय कुरघोडीचे ग्रहण लागल्याचे चित्र धाराशिवच्या राजकारणात पहायला मिळत आहे. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यातील तथाकथित वादामुळे हा संपूर्ण प्रकल्प अडकल्याची चर्चा सुरू सध्या आहे. मागील अठरा महिन्यांपासून हा राजकीय कुरघोडीचा खेळ सुरू असून जिल्ह्याचे ठिकाण असूनही धाराशिव शहरातील रस्ते बकाल अवस्थेत असल्याने नागरिकांना या खराब रस्त्यांचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने नगरोत्थान महाभियानांतर्गत मंजूर असलेल्या या रस्ते विकास प्रकल्पाच्या कार्यादेशाला तूर्तास स्थगिती दिली आहे.

Follow us on social media:

नगर विकास विभागाने धाराशिव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना २८ ऑक्टोबर, २०२५ रोजी पाठवलेल्या पत्रात हे आदेश दिले आहेत. या प्रकल्पासंदर्भात शासनाकडे एक तक्रार प्राप्त झाली असून, या तक्रार / निवेदनातील वस्तुस्थिती तपासून याबाबतचा स्वयंस्पष्ट अहवाल शासनास सादर करावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. हा अहवाल येईपर्यंत प्रकल्पाच्या निविदेच्या अनुषंगाने कार्यादेश देण्याच्या शिफारशीस स्थगिती देण्यात आली आहे.

या रस्ते विकास प्रकल्पाला २३ फेब्रुवारी, २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. त्यानंतर १८ सप्टेंबर, २०२५ रोजी झालेल्या राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीच्या बैठकीत या प्रकल्पाच्या निविदेचा प्रस्तावही सादर करण्यात आला होता.

मात्र, आता थेट शासनानेच या प्रक्रियेला स्थगिती दिल्याने, राजकीय कुरघोडी आणि प्रशासकीय तक्रारींच्या कचाट्यात हा १४० कोटींचा प्रकल्प अडकला आहे. चौकशी अहवाल सादर झाल्यानंतरच या प्रकल्पाचे भवितव्य ठरणार असून धारशिवकर पुन्हा एकदा राजकीय कुरघोडीचे बळी ठरले असून गुळगुळीत रस्त्यांसाठी येथील नागरिकांना अजून किती दिवस वाट पाहावी लागणार आहे? असा संतप्त सवाल धारशिवकर एकमेकांना विचारत आहेत

संबंधित बातम्या

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
ग्रामीण

आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

March 15, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!