धाराशिव – दिनांक 10.04.2022 रोजी फिर्यादी नामे- धीरज सोमनाथ सातपुते, रा. रुईभर, ता. जि. धाराशिव व गावातील इतर 13 साक्षीदार यांचे आधारकार्ड व पॅन कार्ड वापरुन धनीपे ॲप्लीकेशन वरुन एकुण 1, 34,744 रुपयाचे लोन घेवून फसवणुक केले बाबत तक्रार दिल्याने पोलीस ठाणे बेंबळी येथे गुरनं 98/2022 कलम 420 भादवि सह कलम 66 सी, 66 डी माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2008 अन्वये गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्ह्यात मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती बबीता वाकडकर, पोलीस निरीक्षक सायबर पोलीस ठाणे, पोलीस हावलदार राहुल नाईकवाडे व सायबर पोलीस ठाण्याचे पथकाने नमुद गुन्ह्याचे तपासात तांत्रिक विश्लेषण करुन व इतर माहिती प्राप्त करुन सदर गुन्हा हा आरोपी नामे समीर ईलाही शेख, वय 24 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. रुईभर याने धनीपे ॲप्लीकेशन स्वत:चे मोबाईल मध्ये डाउनलोड करुन त्यामध्ये फिर्यादी व इतर साक्षीदार यांची वैयक्तीक माहिती त्यांचे परस्पर भरुन लोन घेतेवेळी स्वत:चे नावे असलेले सिमकार्ड, ईमेलआयडी व सेल्फी लोन खात्यास वापरुन एकुण 1,34,744 रुपयाची ऑनलाईन लोन घेतल्याचे निष्पन्न झाल्याने नमुद आरोपीस दिनांक 01.02.2024 रोजी अटक करुन मा. न्यायालयात हजर करण्यात आले आहे. नमुद आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.