धाराशिव – धाराशिव-बार्शी सीमेवर धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला पकडण्यासाठी ताडोबातून टीम दाखल झाली होती मात्र, ह्या टीम ने सपशेल निराशा करत ‘वाघोबा आझाद केलं तुला’ म्हणत परतीची वाट धरली.वाघाला रेस्क्यू करण्यासाठी ताडोबातून नवसानं टीम पाठली, टीम ने आठ दिवस रामलिंग परिसरात भ्रमंती करण्याचा आनंद लुटला मात्र, वाघ काय नाही दिसला. टीपेश्वर अभयारण्यातील वाघोबाने गेल्या दीड महिन्यांपासून येडशी-बार्शी शिवारात तळ ठोकत शिकार करत धाराशिव -सोलापूर या दोन्ही जिल्ह्यातील निसर्ग सफरीचा आनंद घेत वन अधिकऱ्यांच्या नाकी नऊ आणले आहे.आता नव्याने शोध मोहीम घेत पुण्याच्या टीम ला पाचारण करण्यात आले असून ताडोबाच्या टीम ला बाय बाय करण्यात आले आहे. वाघोबाने आता आपला मोर्चा वाशी तालुक्यातील वडजी परिसरात वळवला आहे. वडजी परिसर ते येमाई तलाव परिसरात वाघोबा आपला मुक्काम ठोकण्याची शक्यता आहे. घनदाट जंगल आणि पाण्याचा परिसर असल्याने या ठिकाणी जनावरे, जंगली जनावरे यांचा वावर असल्याने वाघोबाची मज्जा असणार अशी चर्चा असून वाघोबाचा मुक्काम पोस्ट आता इथेच असणार अशी शक्यता असल्याने रेस्क्यु टीम देखील या ठिकाणी दाखल झाली असून या संदर्भात माहिती घेण्यासाठी पत्रकाराने मुंडे (RFO येडशी वन अधिकारी) यांना लोकेशन विचारले असता लोकेशन सांगता येणार नाही असे सांगितले यावरून एखाद्या अट्टल गुन्हेगाराचे लोकेशन सांगत असल्याचे उसने आवसान आणत प्रश्नाला बगल दिली पण उत्तर न मिळेपर्यंत पुन्हा फिरून त्याच प्रश्नावर न आणणारा तो पत्रकार कसला? परत तोच प्रश्न विचारताच आमचे राज्याचे प्रमुख अधिकारी धाराशिव, बार्शी या ठिकाणी व्हिजिट देण्यासाठी येणार असल्याचे सांगून ते आले की तुम्हाला फोन करतो असे सांगितले. त्यामुळे आता अधिकारी कधी येतात व वाघ पिंजऱ्यात कधी येतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.