बदलापूरच्या नामांकीत शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलीसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखला करत आरोपी अक्षय शिंदेला अटक केली. दरम्यान, आता अक्षय शिंदेबद्दल सर्वात मोठी माहिती समोर आली आहे.
पोलीसांकडून एन्काऊंटर
अक्षय शिंदेला (Akshay Shinde) बदलापूर येथे घेऊन जात असताना, अक्षयने पोलीसांची बंदूक हिसकावून पोलीसांच्या पायावर गोळी झाडली. या वेळी पोलीसांनी सेल्फ डिफेन्ससाठी अक्षयवर गोळ्या झाडल्याचं समोर आलं आहे. बदलापूरच्या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे, असं असतानाच आता बदलापूरातील शाळेत लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना अक्षय शिंदेंने पोलीसांची बंदूक हिसकावून स्वत:वर गोळी झाडली आहे.
अक्षय शिंदेचा मृत्यू-
अक्षय शिंदेला (Akshay Shinde) ट्रान्झिट रिमांडसाठी बदलापूरला घेऊन जात असताना अक्षयने पोलिसांवर गोळीबार करत स्वतःवर गोळी झाडून घेतली. दरम्यान, अक्षयला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं यावेळी त्याचा मृत्यू झाला आहे. स्वतःवर तीन राऊंड फायर झाल्याची माहिती आहे