वाशी – भैरवनाथ शुगर वर्क्स लि वाशी ता. वाशी कारखान्याचा गळीत हंगाम 2024-2025 चा बॉयलर अग्नि प्रदीपन व मोळी पूजनाचा कार्यक्रम दि. 10 ऑक्टोबर 2024 वार रविवार रोजी भैरवनाथ शुगर वर्क्स चे कार्यकारी संचालक श्री विक्रम (केशव) सावंत यांच्या शुभहस्ते व शिवशक्ती शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. वाशीचे व्हॉइस चेअरमन आण्णासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी शिवशक्ती शेत. सह. सा. का. चे संचालक मा. संचालक बाळासाहेब पाटील हाडोग्रीकर, अण्णासाहेब देशमुख, शिवाजीराव धुमाळ, बाबुराव घुले, विष्णू मुरकुटे, विठ्ठल चौधरी तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवनाथ जगताप (सोनारी), वाशीचे सूर्यकांत सांडसे, भागवतराव कवडे, नगरसेवक विकास पवार, वाशीचे मा.नगराध्यक्ष नागनाथ नाईकवाडे, शिवसेना वाशी शहर प्रमुख सतीश शेरकर, शिवसेना युवा नेते प्रकाश शेटे, शिवसेना नेते सुनील जाधवर, उद्धव साळवी, विकास तळेकर, पुंडलिक आखाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. अण्णासाहेब देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भैरवनाथ-शिवशक्ती साखर उद्योग समूह हा आपला सर्वांच्या सहकार्याने यशस्वीपणे समाधानकारक गाळप होत असून आपण प्रत्येक सभासदांच्या उसाला योग्य तो दर देऊन शेतकऱ्यांचे समाधान गेली दहा वर्ष सतत करीत आहोत. विक्रमी भाव देत आहोत यावर्षी तीन लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट समोर आहे व पुढेही असेच उत्कृष्ट कार्य भैरवनाथ शुगर च्या माध्यमातून मा. आमदार डॉ. तानाजीराव सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनातून करत राहणार आहे. यावर्षी भरपूर पाऊस झाल्याने उसाचे विक्रमी उसाची लागवड होणार आहे व भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांचा ऊस गाळप होऊन त्यास जास्तीत जास्त दर दिला जाणार आहे याबाबत शंका नाही तरी कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी-सभासद यांनी आपला ऊस गाळपास द्यावा व मा. आमदार तानाजीराव सावंत साहेब यांना विधानसभा निवडणुकीत त्यांच्या धनुष्यबाण चिन्हावर बटन दाबून त्यांचे हात बळकट करावे व आपल्या मतदार संघाचा विकास करण्याची संधी द्यावी अशी विनंती केली. यानंतर बाबुरावजी घुले यांनी आपले मनोगत व्यक्त करून तानाजीराव सावंत व भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक विक्रम सावंत यांच्या कार्याचे कौतुक केले.

सदर कार्यक्रमात माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोग्रीकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भैरवनाथ कारखान्याचे कारखाना चालू केल्यापासून दरवर्षी विक्रमी गाळप करून उत्कृष्ट दर दिलेला आहे याबाबत कार्यक्षेत्रातील संपूर्ण शेतकरी समाधानकारक आहे व भविष्यात देखील भैरवनाथ शुगर वर्क्स ला सहकार्य करणार आहे तसेच चालू विधानसभा निवडणुकीत आमदार प्रा. तानाजीराव सावंत यांना येत्या 20 तारखेला प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले आहे. आज रोजी यांच्या प्रचार सभेतून मी आलो आहे त्यांना माता-भगिनीचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे तरी या कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी दोन लाख मताधिक्यांनी मा.तानाजीराव सावंत यांना निवडून द्यावे अशी आग्रहाची विनंती केली आहे. याप्रसंगी परिसरातील सभासद शेतकरी, तोडणी ठेकेदार, वाशी, भूम शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते, कारखान्याचे सर्व खाते प्रमुख, उपखाते प्रमुख, कर्मचारी, कामगार, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेना तालुका अध्यक्ष ॲड. सत्यवान जी गपाट यांनी केले उपस्थित असे आभार कारखान्यांचे कार्यकारी संचालक विक्रम (केशव) सावंत यांनी केले.