धाराशिव – बारा बलुतेदारांसाठी श्री संत गाडगेबाबा आर्थिक मागास विकास महामंडळ स्थापन केले जाईल, असे सांगतानाच मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, अशी ग्वाही दिली.
राज्यातील बारा बलुतेदार समाज संघटनांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
प्रतापगड येथे शूरवीर जिवाजी महाले स्मारकासाठी जागा दिली जाईल. बारा बलुतेदार समाजासाठी विश्वकर्मा कौशल्य प्रशिक्षण योजना म्हणून कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून स्वतंत्र व्यवस्था केली जाईल. तेर- ढोकी येथील संत गोरोबा काका समाधीस्थळास ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा दिला जाईल. ऋणमोचन येथील संत गाडगेबाबा कर्मभूमी स्मारकाच्या तसेच पंढरपुरातील नामदेव महाराज समाधीस्थळ विकासासाठी गती दिली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या वेळे माजी आमदार बळीराम शिरास्कर, प्रदेश अध्यक्ष कल्याणजी दळे, बलुतेदार महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय (नाना) शिंगाडे,योगेश केदार मराठा व ओ.बी.सी समन्वयक प्रतापराव गुरव, वडीले तात्या तसेच बारा बलुतेदार महासंघाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.