सदरील हिंस्त्र प्राणी वाघ की बिबट्या? वन अधिकारी संभ्रमात
येरमाळा – कळंब तालुक्यातील मलकापूर येथे
गुरुवारी (ता.२६) रात्री अज्ञात हिंस्त्रप्राण्याने वासराची शिकार केल्याची घटना रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. शेतात असणाऱ्या शेतकऱ्यांनी वासराला ज्वारीच्या पिकात हिंस्त्रप्राण्याने ओढत नेल्याच्या प्रकार पहिला. वनविभागाला सदरील घटनेची माहिती देताच वनविभागाचे गस्त पथक मलकापुर शिवारात दाखल झाले होते. येडशी अभयारण्यात वाघाचा मुक्काम वाढणार असुन शेतकऱ्यात भीतीचे वातावरण असुन वनविभागाकडून शेतकऱ्यांचे सुरक्षितता, बचाव, व्याघ्रसंरक्षण या बाबत समुपदेशन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
येडशीच्या अभयारण्यात गेल्या तीन दिवसांपासून वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात वाघाचे रोजच दर्शन होत असुन मंगळवारी बार्शी तालुक्यातील ढेंबरेवाडी तलाव परिसरात वाघोबा दिसल्याची माहिती आहे.येडशी अभयारण्यालगत बालाघाटातील वडगाव, चोराखळी, उक्कडगाव, पिंपळवाडी (ता.बार्शी) श्री.येडेश्वरी मंदिर येरमाळा परिसरात सार्वजनिक वनविभागाचे वनक्षेत्र आहे.
गुरुवारी (ता.२६) कळंब तालुक्यातील मलकापूर येथील
शेतकरी विश्वास आनंदराव लोमटे,किरण लोमटे
हेमंत लोमटे शेतात गेले असता हेमंत लोमटे यांचे गायीचे वासरु हिंस्त्र वाघसदृष्य वन्यप्राणी फरफटत घेऊन जात असल्याचे निदर्शनास आल्याने आजुबाजुचे शेतकरी जमा होऊन आरडाओरडा केला. सदरील घटनेची माहिती वनविभाग अधिकाऱ्यांना ग्रामपंचायत सदस्य आदित्य लोमटे यांनी संपर्क करुन सदरील घटनेची माहिती देताच येडशी अभयारण्याचे वन्यप्राणी वनपरिक्षेत्रपाल ए. डी.मुंडे,वनविभाग भूम परिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल दीपक गांधले वनरक्षक सतीश साळुंके, बालाजी ससाने, गजानन दांडगे, संकेत टाके, सागर जगताप, प्रमोद कांबळे, वनसेवक भारत काकडे सर्व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन परिसरात टेहळणी करण्यास सुरुवात केली. ज्वारी हे पिक उंच असल्याने रात्रीची वेळ असल्याने ठसे टेहळणी करता येत नसल्याने जमावाला घरी पाठवून आज सकाळी घटनास्थळाचा पंचनामा करुन त्याठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
भीतीचे सावट असले तरी समुपदेशनाची गरज
जिल्ह्यातील चार तालुक्यात बिबटया,वाघाचा वावर असल्याचे वनविभागाने सांगितले आहे. सध्या या हिंस्त्र वन्याप्रण्यासह,नामशेष होतं चाललेल्या राष्ट्रीय वाघ प्राण्याच्या येण्याने वन्यप्राणी प्रेमित आनंदाचे वातावरण, कुतूहल निर्माण झाल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसत असले तरी सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यात भीतीचे वातावरण आहे. असे असले तरी अभयारण्यात राहणाऱ्या इतर प्राण्यांसह मानवी जीवाचे,तर मानवी जीवापासून दुर्मिळ वाघाचे संसरक्षण होणे गरजेचे असल्याने,मानवी जीवाकडून सुरक्षिततेसाठी वाघाला दगा फटका होण्याची शक्यता पाहता या परिसरातील शेतकऱ्यांचे स्वरक्षणासह,व्याघ्ररक्षणा बाबत वनविभागाकडून समुपदेशन होणे गरजेचे आहे.
दरम्यान परिसरात सद्या बिबट्या,वाघ या सारख्या हिंस्त्रवन्य प्राण्यांचा वावर परिसरात वाढल्याने शेतकऱ्यांना वन्यप्राणी संरक्षणासह स्वरक्षणासाठी वनविभाग काय उपाययोजना करणार यासाठी येडशी अभयारण्याचे वन्यप्राणी वनपरिक्षेत्रपाल ए.डी.मुंडे यांना दोन वेळा संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही
मलकापूर येथे हिंस्र प्राण्याने वासरावर हल्ला करुन ठार केल्याचा पंचनामा केला आहे.पाऊस पडल्याने ठसाचे पंचनामे करण्यात अडचण आली . तो हिंस्र प्राणी वाघ आहे की बिबट्या याबाबत शंका आहे.ठसे बिबट्या सदृश्य असुन वासरु हल्यात मृत्युमुखी पडल्याने शेतकऱ्याचे झालेले नुकसान भरपाई वनविभागाकडून मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू . शेतामध्ये रात्री अपरात्री आवश्यक असेल तरच शेतकऱ्यांनी बाहेर पडावे . हातामध्ये काठी, बॅटरी असावी . मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी लावावीत किंवा मोठ्या आवाजात बोलावे म्हणजे वाघ, बिबट्या जवळ येणार नाहीत .
– दीपक गांधले
वनपरीक्षेत्र अधिकारी भूम.