धाराशिव – येडशी परिसरातील वनक्षेत्रात गुरुवारी दुपारी संघरत्न ताकपिरे यांच्या गाईवर वाघाने हल्ला केल्याचा प्रकार घडला होता.त्यामुळे नागरिक व शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली होती. ताकपिरे यांच्या म्हणण्यानुसार वघानेच गाईवर हल्ला केल्याचे मी स्वतः पाहिले आहे. वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये देखील तो वाघच असल्याचे निदर्शनास आले असून वाघाचा फोटो देखील कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
वाघाच्या मार्गावर वन विभागाने पथके लावले आहेत शिवाय 15 ट्रॅप कॅमेरे देखील लावले आहेत. गेल्या महिनाभरापासून धाराशिव जिल्ह्यातील कळंब, परंडा, भूम, वाशी या चार तालुक्यात बिबट्याची दहशत पसरली आहे. अशातच आता वाघाचे दर्शन झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
धाराशिव जिल्ह्यात ऊस क्षेत्र वाढल्यामुळे बिबट्या आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. ऊस तोडणी सुरुवात होताच बिबट्या आढळून येण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. गेल्या 20 दिवसांपूर्वी परंडा तालुक्यात बिबट्या आढळला होता. त्यानंतर कळंब, भूम, वाशी या तालुक्यात देखील बिबट्याचे दर्शन झाले होते. भूम, परंडा व वाशी तालुक्यांत बिबट्याने 12 जनावरांचा फरशा पडला असून एका शेतकऱ्यावर हल्ला देखील केला आहे.
अधिक अपडेट्स साठी आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करा
बिबट्याने वन विभागाची डोकेदुखी वाढवली असून अशातच गुरुवारी येडशी वनक्षेत्र परिसरात वाघ आढळून आल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे