वाशी – जरांगे पाटील यांच्यावर वाशी येथील सभेमध्ये १०० जेसीबीमधून पुष्पवृष्टी केली तसेच, जरांगे यांना तब्बल १ टन एवढ्या वजनाचा फुलांचा हार क्रेनच्या सहाय्याने घालण्यात आला. माळी समाजाच्या वतीने हा फुलांचा हार घालण्यात आला होता.मनोज जरांगे पाटील यांची धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथे सभा पार पडली आहे. मात्र, वाशी येथील सभा सुरु होण्यापूर्वीच एक मोठा वाद निर्माण झाला होता. जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी १०० किलो फुलांचा हार बनविण्यात आला होता मात्र, हा हार बनविणाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय.माळी समाजातील कार्यकर्ता भगवान ओव्हाळ आणि दत्तात्रय तोडकर यांनी हा १ टन वजनाचा हार बनवला होता.
(हे देखील वाचा – भारताचा विजयरथ फायनलमध्ये)
याच दोन कार्यकर्त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. नाशिक येथून काही पदाधिकारी धमकी देत असल्याचा आरोप भगवान ओव्हाळ आणि दत्तात्रय तोडकर यांनी केला आहे.मराठा समाजाला आरक्षण द्यावे आणि मंत्री भुजबळ यांच्या आरक्षणविरोधी भूमिकेला भगवान ओव्हाळ आणि दत्तात्रय तोडकर यांनी जाहीर विरोध केला होता. तर, जरांगे यांचे वाशी येथे पुष्पवृष्टी करून माळी समाजाच्यावतीने स्वागत करण्यात येणार आहे. त्यामुळेच आपणास धमकी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.