वनडे विश्वचषक 2023 मधील पहिला उपांत्य फेरीचा सामना वानखेडे स्टेडियम मुंबई येथे खेळला गेला. यजमान भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान झालेल्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 397 धावा उभ्या केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडसाठी डेरिल मिचेल व कर्णधार केन विलियम्सन यांनी संघर्ष केला. मात्र, अखेरीस त्यांचे प्रयत्न 70 धावांनी अयशस्वी ठरले. भारतीय संघाने हा विजय मिळवत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.