वाशी – धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पवनचक्की प्रकल्प उभारला जात आहे. पवनचक्कीच्या मुद्द्यावरून शेतकरी व प्रशासकीय अधिकारी यांच्यात खटके उडाल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अशातच आता वाशी तालुक्यातील एक घटना समोर आली आहे.
वाशी तालुक्यातील गोलेगाव शिवारात बुधवार (दिनांक ९) रोजी अभयसिंह (अमर) मुरलीधर तागडे रा. वाशी यांनी फिर्यादी उमेश रकटे यांना “तू आमच्या शेता जवळ का आलास?” असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी देखील दिली अशा स्वरूपाची फिर्याद उमेश रकटे यांनी वाशी पोलीस स्टेशन मध्ये नोंदवली आहे.
दरम्यान या घटने संदर्भात संबंधित ठेकेदार पप्पू माने यांना संपर्क साधला असता माने यांनी सांगितले की संबंधित शेतकरी हा आमच्याकडे वारंवार खंडणीची मागणी करत आहे. अनेकदा त्याने आम्हाला फोन करून खंडणीची मागणी केली आहे.

सतत होणाऱ्या खंडणीच्या मागणी मुळे आम्ही तागडे यांचे फोन उचलणे टाळल्याने त्यांनी ह्याच रागातून तुम्हाला गाडी ने उडवून देऊन जीवे मारीन अशी धमकी दिली असल्याने आमच्या जीवाला धोका असल्याचे सांगत तागडे यांचा त्यांच्या शेताचा व पवनचक्कीचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना देखील वारंवार पैशांचा तगादा लावून नाहक त्रास देत असल्याचे सांगितले.