धाराशिव – शासनाने सोलापूर विभागातील प्रसिद्ध असलेले उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘धाराशिव’ करण्याचा अधिकृत निर्णय घेतला आहे. याबाबतची अधिसूचना २५ एप्रिल २०२५ रोजी शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली असून, केंद्रीय रेल्वे प्रशासनाने देखील त्याला मान्यता दिली आहे.रेल्वे स्थानकाच्या नावातील हा बदल केवळ नावापुरताच असून, स्थानकाचा संख्यात्मक कोड (Numerical Code) ‘01527246’ पूर्ववत राहणार आहे. मात्र, स्थानकाच्या नावाबरोबरच कोड इनिशियल्स (Code Initials) मध्ये ‘UMD’ ऐवजी आता ‘DRSV’ असा बदल करण्यात आलेला आहे.‘धाराशिव’ हे नवीन नाव तीन भाषांमध्ये पुढीलप्रमाणे दर्शवले जाणार आहे:मराठी – धाराशिवहिंदी – धाराशिवइंग्रजी – DHARASHIVया निर्णयाबाबत IRCA (नवी दिल्ली), CSMT मुंबई कार्यालय, भारतीय सर्वेक्षण महासंचालनालय यांनीही आपली सहमती नोंदवली आहे. सर्व संबंधित कर्मचार्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करावी व योग्य ती नोंद घ्यावी, असे आवाहन मुख्य वाणिज्य व्यवस्थापक (PM) श्री. आर. एस. गवांदे यांनी केले आहे.या नामांतरामुळे स्थानकाच्या ओळखीमध्ये ऐतिहासिक दृष्टिकोनातून सकारात्मक बदल होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.