वाशी – वाशी तालुक्यातील बावी ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचार उघड व्हावा या मागणीसाठी ग्रामस्थ उपोषणाला बसले होते. हे उपोषण मागे घेण्यात यावे यासाठी भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी त्रयस्थ समिती नेमणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आश्वासन दिले होते.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनाची अद्याप देखील पूर्तता झाली नसल्याने उपोषणकर्ते व ग्रामस्थ हे पुढील दोन दिवसात सीईओंची भेट घेणार आहेत. भावी ग्रामपंचायत मध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप असून हा भ्रष्टाचार उघड व्हावा व संबंधितावर कठोर कारवाई व्हावी अशी भावी येथील ग्रामस्थांची भूमिका आहे. त्यामुळे ह्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी न झाल्यास पुन्हा एकदा तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.