• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Friday, July 4, 2025
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न📰 धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या📰 धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन📰 खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा📰 ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात 63.88 टक्के मतदान

MH25News by MH25News
May 8, 2024
in ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
मतदानाच्या दिवशी 7 मे रोजी आठवडी बाजार बंद राहणार
0
SHARES
0
VIEWS

सर्वाधिक मतदान तुळजापूर विधानसभा क्षेत्रात

12 लक्ष 72 हजार मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

81 पैकी 20 तृतीय पंथीयांनी केले मतदान

धाराशिव – उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 7 मे रोजी मतदान झाले. या निवडणूकीच्या मतदानाची टक्केवारी 63.88 इतकी आहे. 19 लक्ष 92 हजार 737 मतदारांपैकी 12 लक्ष 72 हजार 969 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 6 लक्ष 90 हजार 533 पुरुष, 5 लक्ष 82 हजार 416 स्त्री आणि 20 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.

औसा विधानसभा मतदारसंघ

1 लक्ष 56 हजार 479 पुरुष, 1 लक्ष 37 हजार 604 स्त्री व 3 तृतीयपंथी मतदार असे एकूण 2 लक्ष 94 हजार 86 मतदार असून त्यापैकी 1 लक्ष 1 हजार 978 पुरुष, 87 हजार 536 स्त्री आणि एक तृतीयपंथी अशा एकूण 1 लक्ष 89 हजार 515 मतदारांनी मतदान केले. यामध्ये पुरुषांची मतदानाची टक्केवारी 65.17 टक्के, महिलांची 63.61 टक्के तर तृतीयपंथीयांची 33.33 टक्के अशी एकूण 64.44 टक्के इतकी आहे.

उमरगा विधानसभा मतदारसंघ

3 लक्ष 10 हजार 703 मतदार असून यामध्ये 1 लक्ष 64 हजार 500 पुरुष, 1 लक्ष 46 हजार 193 स्त्री आणि 10 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. यापैकी 1 लक्ष 291 पुरुष, 87 हजार 56 स्त्री आणि 4 तृतीयपंथी मतदार अशा एकूण 1 लक्ष 87 हजार 351 मतदारांनी मतदान केले. पुरुष मतदारांची टक्केवारी 60.97, स्त्री मतदारांची 59.55 टक्के आणि तृतीय पंथीयांची टक्केवारी 40 टक्के असे एकूण टक्केवारी 60.30 टक्के आहे.

तुळजापूर विधानसभा मतदारसंघ

तुळजापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले त्याची टक्केवारी 65.40 इतकी आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघात 1 लक्ष 98 हजार 517 पुरुष, 1 लक्ष 77 हजार 39 स्त्री आणि 6 तृतीयपंथी मतदारांचा समावेश असून काल झालेल्या निवडणूकीत 1 लक्ष 34 हजार 1 पुरुष, 1 लक्ष 11 हजार 625 स्त्री आणि एका तृतीयपंथीयाने अशा एकूण 2 लक्ष 45 हजार 627 मतदारांनी मतदान केले. यामध्ये 67.50 टक्के पुरुष, 63.05 टक्के स्त्री व 16.67 टक्के तृतीयपंथी अशा एकूण 65.40 टक्के मतदारांनी मतदान केले.

उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ

1 लक्ष 92 हजार 957 पुरुष, 1 लक्ष 72 हजार 977 स्त्री व 17 तृतीयपंथी असे एकूण 3 लक्ष 65 हजार 951 मतदार आहेत. त्यापैकी 1 लक्ष 28 हजार 121 पुरुष, 1 लक्ष 5 हजार 985 स्त्री अशा 2 लक्ष 34 हजार 106 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 66.40 टक्के पुरुष, 61.27 टक्के स्त्री असे एकूण 63.97 टक्के मतदान झाले.

परंडा विधानसभा मतदारसंघ

1 लक्ष 73 हजार 146 पुरुष, 1 लक्ष 52 हजार 13 स्त्री व 6 तृतीयपंथी मतदार असे एकूण 3 लक्ष 25 हजार 165 मतदार असून त्यापैकी 1 लक्ष 13 हजार 940 पुरुष, 92 हजार 673 स्त्री व 3 तृतीयपंथी असे एकूण 2 लक्ष 6 हजार 616 मतदारांनी मतदान केले. मतदानाची पुरुषांची टक्केवारी 65.81, स्त्री टक्केवारी 60.96 टक्के व 50 टक्के तृतीयपंथी अशी एकूण टक्केवारी 63.54 टक्के इतकी आहे.

बार्शी विधानसभा मतदारसंघ

1 लक्ष 66 हजार 497 पुरुष, 1 लक्ष 54 हजार 734 स्त्री व 39 तृतीयपंथी मतदार अशा एकूण 3 लक्ष 21 हजार 270 मतदारांचा समावेश आहे. 7 मे रोजी 1 लक्ष 12 हजार 202 पुरुष, 97 हजार 541 स्त्री आणि 11 तृतीयपंथी अशा एकूण 2 लक्ष 9 हजार 754 मतदारांनी मतदान केले. यामध्ये 67.39 टक्के पुरुष, 63.04 स्त्री व 28.21 तृतीयपंथी अशा एकूण 65.29 टक्के मतदारांनी मतदान केले.
येत्या 7 मे रोजी झालेल्या निवडणूकीसाठी 10 लक्ष 52 हजार 96 पुरुष, 9 लक्ष 40 हजार 560 स्त्री आणि 81 तृतीयपंथी असे एकूण 19 लक्ष 92 हजार 737 मतदारांचा मतदार यादीत समावेश आहे. त्यापैकी 6 लक्ष 90 हजार 533 पुरुष, 5 लक्ष 82 हजार 416 स्त्री व 20 तृतीयपंथी मतदार अशा एकूण 12 लक्ष 72 हजार 969 मतदारांनी मतदानाचा या निवडणूकीत हक्क बजावला. यामध्ये 65.63 टक्के पुरुष, 61.92 टक्के स्त्री व 24.69 टक्के तृतीयपंथी अशा एकूण 63.88 टक्के मतदारांनी मतदान केले.
उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 मध्ये आत्तापर्यंतचे सर्वाधिक 31 उमेदवार या निवडणूक रिंगणात आहे. सन 2019 च्या सार्वत्रिक निवडणूकीत 14 उमेदवार, सन 2014 च्या निवडणूकीत 27 उमेदवार, सन 2009 च्या निवडणूकीत 25 उमेदवार, सन 2004 मध्ये 8 उमेदवार, सन 1999 मध्ये 5 उमेदवार, सन 1998 मध्ये 7 उमेदवार, सन 1996 मध्ये 21 उमेदवार, सन 1991 मध्ये 17 उमेदवार, सन 1989 मध्ये 12 उमेदवार, सन 1984 मध्ये 6 उमेदवार, सन 1980 मध्ये 5 उमेदवार, सन 1977 मध्ये 3 उमेदवार, सन 1971 मध्ये 5 उमेदवार, सन 1967 मध्ये 3 उमेदवार, सन 1962 मध्ये 3 उमेदवार, सन 1957 मध्ये 2 उमेदवार, सन 1951-52 च्या सार्वत्रिक निवडणूकीत 2 उमेदवारांत लढत झाली.
येत्या 4 जून 2024 रोजी 18 व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतमोजणी होणार आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील 31 उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले असून सर्वांचे लक्ष 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे.

संबंधित बातम्या

कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न
ग्रामीण

कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न

July 2, 2025
धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या
क्राइम

धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या

June 30, 2025
धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन
अर्थव्यवस्था

धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन

June 27, 2025
खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा
आरोग्य

खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा

June 26, 2025
ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
क्राइम

ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले

June 16, 2025
इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा
क्राइम

इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा

June 13, 2025

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न
  • धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या
  • धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन
  • खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा
  • ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!