पंढरपूर – आज कार्तिकी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली. त्यांच्यासोबत यंदाचे मानाचे वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला गावातील बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे यांना पुजेचा मान मिळाला. घुगे दांपत्य गेल्या १५ वर्षांपासून वारी करत आहेत.
(हे देखील वाचा – शिक्षकाकडे महिलांचे अश्लील व्हिडिओ)
आज पहाटे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते महापूजा झाली. पूजेसाठी देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस एक दिवस आधीच म्हणजे काल(बुधवारी) पंढरपूरमध्ये दाखल झाले. महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती सुखी झाला पाहिजे हेच विठुरायाकडे मागणं आहे, तसेच, सर्वांच्याच मनोकामना पूर्ण करण्याची ताकद त्यानं आम्हाला द्यावी, असं साकडं देवेंद्र फडणवीसांनी विठ्ठलाच्या चरणी घातलं आहे.