बीड – बीड शहरातील मिल्लीया (मुलांची) शाळा येथील शिक्षक आमेर काझी याने अनेक महिलांचे अश्लील व्हिडिओ तयार केल्याचे प्रकरण समोर आले. याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद झाल्यानंतर संस्थेने आमेर काझी याच्यावर तडकाफडकी निलंबनाची कार्यवाही करण्यात आली असून या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती अंजुमन इशात ए तालीम या संस्थेच्या सचिव खान सबीहाबाजी यांनी दिली आहे. संस्थे अंतर्गत असलेल्या शाळांमध्ये अशा प्रकारचे गैरप्रकार कधीही खपवून घेतले जाणार नाहीत आणि कोणालाच माफी नाही असेही त्यांनी सांगितले.
बीड शहरातील अंजुमन इशात ए तालीम या संस्थेअंतर्गत असलेल्या मिल्लीया मुलांची शाळा येथील शिक्षक आमेर काझी याने महिलेसोबत चा अश्लील व्हिडिओ तयार केल्याचे प्रकरण समोर आले होते. यामध्ये पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर संस्थेने आमेर काझी याला नोटीस पाठवून 24 तासात खुलासा मागवला होता. काझी याने सादर केलेला खुलासा अमान्य करत संस्थेने आमेर काझी यास तात्काळ निलंबित केले. या प्रकरणांमध्ये कायदे तज्ञांची टीम गठीत करण्यात आली असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरूच राहणार आहे. त्याचबरोबर अश्लील व्हिडिओच्या संदर्भात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्याविरुद्ध देखील संस्था कडक आणि शासनाचा सेवा शर्ती नियमानुसार कारवाई करणार असल्याचे संस्थेच्या सचिव खान सबीहाबाजी यांनी सांगितले.
(हे देखील वाचा – मनोज जरांगे पाटील यांची सभा घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल)
बीड शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील पालकांनी, समाजसेवकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि विशेषतः माध्यमांनी नेहमीच संस्थेला सहकार्य केलेले आहे. या सर्वांच्या बळावरच आज ही संस्था नावा रूपाला आलेली आहे. ही संस्था तुम्हा आम्हा सगळ्यांची आहे. त्यामुळे असे प्रकार कधीच खपवून घेतले जाणार नाहीत. पालकांनी या संस्थेअंतर्गत असलेल्या शाळांवरील विश्वास कायम ठेवावा असे आवाहन संस्थेच्या सचिव सबीहाबाजी यांनी केले आहे.