धाराशिव – सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य जिल्हा धाराशिव सैनिकासाठी मदतीचा हात ,अकरा मराठा लाईट इन्फंट्री आर्मी, सध्या कार्यरत असलेले जम्मू काश्मीर पूँछ जिल्हा ,नायक अनिल भरत फेरे रा, तावरसखेडा जि.धाराशिव यांना शेजाऱ्यापासून होत असलेल्या सततचा त्रास आर्थिक व मानसिक हानी रस्त्यामुळे होत असलेल्या सततचा त्रास होत, असल्यामुळे त्यांना सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून ,सैनिकासाठी मदतीचा हात देण्यात आला.आदरणीय सैनिक फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जावळे ,कार्याध्यक्ष अशोक गाडेकर यांच्या संयुक्त कार्याने, नायक अनिल फेरे यांच्या अडीअडचणी समजून घेऊन आदरणीय जिल्हाधिकारी साहेब, डॉ. सचिन ओंबासे धाराशिव, तसेच तहसीलदार बिडवे साहेब यांची भेट घेऊन, त्यांच्या शेतातील सविस्तरपणे अडचणी मांडल्या, तहसीलदार साहेबांनी दोन दिवसाच्या आत ,मंडळ अधिकारी पाठवून स्पॉट पंचनामा करून घेण्याच्या आदेश देण्यात आले, तसेच माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी सैनिकासाठी योग्य ते न्याय लवकरात लवकर देऊ असे आश्वासन दिले, त्याबद्दल सैनिक फेडरेशन धाराशिव जिल्हा यांच्यातर्फे मनस्वी आभार.