• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Friday, July 4, 2025
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न📰 धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या📰 धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन📰 खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा📰 ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

शिवराज राक्षे ठरला महाराष्ट्र केसरी तर हर्षवर्धन सदगीर ठरला उपविजेता

MH25News by MH25News
November 21, 2023
in क्रीडा, ग्रामीण, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
शिवराज राक्षे ठरला महाराष्ट्र केसरी तर हर्षवर्धन सदगीर ठरला उपविजेता
0
SHARES
0
VIEWS

मानाची चांदीची गदा, स्कार्पिओ, ट्रॅक्टरसह बुलेट व हिरो होंडा आदींची २ कोटी रुपयांची बक्षीसे

प्रचंड अतितटीच्या सामन्यात पाहण्यासाठी कुस्तीपटूंची तुफान गर्दी

धाराशिव (दि.२०) धाराशिव येथे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, जिल्हा तालीम संघ व महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या महाराष्ट्र केसरी नांदेडचा शिवराज राक्षे विजेता तर नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला उपविजेता. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक मल्लांनी सहभाग नोंदविला. दरम्यान, मानाची चांदीची गदा, स्कार्पिओ, ट्रॅक्टरसह बुलेट व हिरो होंडा आदींची २ कोटी रुपयांची बक्षीसे विजेत्या मल्लांनी पटकवली.

या स्पर्धेचे आयोजक सुधीर पाटील व मुख्य कार्यवाहक अभिराम पाटील व मान्यवरांच्या हस्ते नांदेडचा शिवराज राक्षे याला ६५ वा महाराष्ट्र केसरी किताब व महिंद्रा स्कॉर्पिओ आणि मोहोळ घरण्याकडून परंपरेने चालत आलेले चांदीची गदा देण्यात आली. तर उपमहाराष्ट्र केसरी मल्ल नाशिक चा हर्षवर्धन सदगीर याला मान्यवरांच्या हस्ते महिंद्रा 575 DI व लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या स्मरणार्थ या वर्षीपासून देण्यात आलेले चांदीची गदा देऊन गौरविण्यात आले.
धाराशिव येथील तुळजाभवानी क्रीडा संकुलावरील गुरुवर्य के.टी. पाटील सर (बप्पा ) क्रीडा नगरीमध्ये दि.१६ ते २० नोव्हेंबर दरम्यान झालेल्या ६५ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेकडे अख्या राज्याचे लक्ष लागले होते. या वर्षीचा महाराष्ट्र केसरी कोण ? याचे उत्तर आज झालेल्या लढतीत सर्वांना मिळाले.

आज झालेल्या रुस्तुम-ए – हिंद हश्चिचंद्र बिराजदार आखाड्यावर रंगलेल्या उपांत्य चुरशीच्या लढतीत नांदेडाचा शिवराज राक्षे व मुंबई पाश्चिम उपनगराकडून खेळणारा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात गादी गटात चुरशीची लढत झाली. या एकतर्फी लढतीत ६ – ० गुणांने नांदेडचा शिवराज राक्षे विजयी झाला. तर माती गटात झालेल्या हिंगोलीचा गणेश जगताप विरुद्ध नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात झालेल्या लढतीत २-६ ने नाशिकचा हर्षवर्धन सदगीरने बाजी मारली. महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीसाठी नाशिकचा हर्षवर्धन सदगीर व नांदेडचा शिवराज राक्षे या दोन मल्लानी बाजी मारत शेवटच्या अंतिम कुस्तीमध्ये दोन्ही पैलवानांनी धडक मारली.

यानंतर २० मिनिटांच्या विश्रांतीनंतर या दोन मल्लांची कुस्ती पाहण्यासाठी प्रेक्षकांनी श्वास रोखून धरला होता. या अटीतटीच्या लढतीकडे अख्या महाराष्ट्रातील कुस्ती प्रेमींचे लक्ष लागले होते. शेवटच्या या अंतिम लढतीत नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध नाशिकचा हर्षवर्धन सदगीर या मल्लात झालेल्या मॅटवरील कुस्तीत या ६-० गुणांनी नांदेडचा शिवराज राक्षे या पैलवानाने प्रतिस्पर्धी मल्लावर मात करत महाराष्ट्र केसरी हा मानाचा किताब पटकावला.
या अंतिम टप्प्यातील कुस्त्या पाहण्यासाठी धाराशिव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ख्यातनाम आजी – माजी मल्लासह आ कैलास पाटील, पद्मश्री, ऑलिंपिक कास्यपदक विजेता योगेश्वर दत्त, महाराष्ट्र केसरी राहुल आवारे, अर्जुन पुरस्कार प्राप्त काकासाहेब पवार, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, माजी खासदार रविंद्र गायकवाड, भाजप जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर, डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील, दीपक जवळगे, चंद्रकांत मोहोळ, संग्राम मोहोळ, शिवसेना (बाळासाहेब) चे जिल्हाध्यक्ष सुरज सांळुके, मोहन पनुरे, संजय पाटील दुधगावकर, धनजंय सावंत, महेंद्र धुरगुडे, संजय निंबाळकर, धनजंय शिंगाडे, विकास कुलकर्णी, जयसिंह देशमुख, सुधाकर मुंडे, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, उपाध्यक्ष विजय बराटे, विभागीय सचिव वामनराव गाते, भरत मेकाले, स्पर्धेचे व्यवस्थापक सुंदर जवळगे, गोविंद पवार, धनराज भुजबळ, शरद पवार, गोविंद घारगे, संतोषराव नलावडे, शिवाजी धुमाळ उपस्थित होते. तर असंख्य कुस्ती शौकीनांनी मैदानावर तुफान गर्दी केली होती.

संबंधित बातम्या

कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न
ग्रामीण

कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न

July 2, 2025
धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या
क्राइम

धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या

June 30, 2025
धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन
अर्थव्यवस्था

धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन

June 27, 2025
खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा
आरोग्य

खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा

June 26, 2025
ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
क्राइम

ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले

June 16, 2025
इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा
क्राइम

इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा

June 13, 2025

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न
  • धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या
  • धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन
  • खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा
  • ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!