बीड – मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच तापत चालला आहे. सरकारने मनोज जरांगे पाटलांना दिलेली तारिख उद्या संपत आहे. त्याआधी बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांची इशारा सभा पार पडली. या सभेत त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. येत्या २० जानेवारीपासून मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. यात मुंबईत येण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी लोकांना ॲक्शन प्लॅन देखील सांगितला आहे.
हे देखील वाचा – जास्त घेतल्याने जरांगेला विस्मरण – छगन भुजबळ
बीडमधील झालेल्या इशारा सभेत नव्या वर्षीतील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली आहे. स्वत: आंतरवाली सराटीतून मुंबईकडे पायी निघणार आहे. देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहे. जाती पेक्षा मोठा नेता मानू नका. आपली मते घेण्यापुरता दारी आला तर त्याला चपलेने बडवा. पोरांना अटक झाली तर आमदार आणि मंत्र्यांच्या घरी जाऊन बसा. असं आव्हान करत सरकारने दहा बारा दिवस मिळत आहेत ते बघावते. एकदा अंतरवालीमधून निघालो तर पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत परत येणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, पायी मुंबईला जाताना वाटेत लोक सोबत येतील, मुंबईकडे कुच करतील. मुंबईला येताना कुणीही हिंसा करायची नाही. मराठ्यांना कोणताही डाग लागू द्यायचा नाही. कुणीही जाळपोळ, तोडफोड करायची नाही. शांततेच जायचं. शांततेच यायचं. जो हिंसा करेल तो आपला नाही. हिंसा करणाऱ्यांना पकडून द्या. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागे यायचं नाही. असंही मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.