मुंबई – मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज बीडमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगेची सभा पार पडली. या सभेत त्यांनी पुन्हा एकदा ओबीसी नेते आणि अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा एकेरी उल्लेख करत ‘येवल्याचा येडपट’ अशा शब्दात टीका केली. तसेच काही वेडवाकडं बोलू नको. झोपून राहा. माझ्या नादाला लागू नको. नाही तर कचकाच दाखवेन. मराठा आरक्षण मिळाल्यानंतर तुला बघून घेतो, असा इशारा दिला. त्यावर भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. मी अशा कोल्हेकुईला भीक घालत नाही. दादागिरीला मी घाबरत नाही. त्यांच्या जन्माच्या आधीपासून मी आंदोलन करतोय, असे सांगतानाच त्यांच्या भाषणातच विसंगती होती. जास्त घेतल्यामुळे त्यांना विस्मरणाचा त्रास झाला असेल. त्यांनी आता २० जानेवारीपर्यंत हॉस्पिटलमध्ये अराम, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली आहे.
जरांगेची सभा पार पडल्यानंतर छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांच्या प्रत्येक टीकेचा समाचार घेतला. आज त्यांनी केलेल्या अर्ध्या भाषणात माझाच उल्लेख होता. आरक्षण मिळू दे मग तुलाबघून घेतो, असे ते वारंवार बोलत होते. मात्र छगन भुजबळ अशा कोल्हेकुईला दाद देत नाही. भुजबळ आयुष्यभर अशा दादागिरीच्या विरोधात लढला आहे. तुमच्या जन्माच्या आधीपासून भुजबळ लढाई करत आहे, असे भुजबळ म्हणाले.
छगन भुजबळ म्हणाले की, आज राज्य सरकारने दाखल केलेली क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारली असून २४ जानेवारीला त्यावर सुनावणी होणार आहे. मराठा समाजाला आरक्षण द्या, पण वेगळे आरक्षण द्या, असा युक्तिवाद मोठ्या वकिलांच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये चांगल्या प्रकारे मांडता जाईल. सुप्रीम कोर्टाने जो अडथळा दाखवून दिला होता तो दूर होऊ शकेल. मराठा आरक्षणाला आमचा कधीच विरोध नव्हता, जुन्या कायद्याला मी विधानसभेत पाठिंबा दिला होता.
कधी म्हणतात येवल्याचा येडपट आहे. मी जर म्हटले तर खूप वातावरण तापेल. बीडमध्ये झालेली जाळपोळ आणि आमदारांची घरे ही भुजबळांनी येवल्याहून येऊन जाळली, असे मनोज जरांगे म्हणाले. मात्र जरागें यांची स्मरणशक्ती कमी झाली आहे. याआधी त्यांनी म्हटले होते की पोलिसांनी आमदारांची घरे जाळली. आता बीडमधील सभेत ते सांगतात की भुजबळांनी येवल्याहून येऊन प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर यांचे घर पेटवले. ओबीसी समाजाची घरे आणि हॉटेल जाळले. मात्र त्याच भाषणात पुढे बोलताना ते म्हणतात, मराठ्यांच्या वाटेला जाऊ नका, नाही तर लक्ष्यात ठेवा बीडमध्ये काय झाले. यामुळे जास्त घेतल्यामुळे त्यांच्या भाषणात विसरण्याचा भाग जास्त आला. जास्त घेतल्याचा हा परिणाम आहे. जास्त घेतल्यामुळे त्यांच्या भाषणात विसरण्याचा भाग आहे. आता ते २० जानेवारीपर्यंत शांत बसणार आहेत. ते हॉस्पिटलमध्ये राहतात. ते एक तर हॉस्पिटलमध्ये तरी राहतात किंवा बाहेर तरी. त्यांची१२ इंचीची छाती आहे. छाती जास्त ठोकू नका. छातीत गडबड होईल. स्वतःची प्रकृती सांभाळा. अरे म्हटले तर कारे होईलच. माझ्याबद्दल मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण करणारे विधान करत असतील तर मला बोलाले लागेलच, असे भुजबळ म्हणाले.