वाशी – मराठा आरक्षणासाठी धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील सरमकुंडी येथे एकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सरमकुंडी (ता.वाशी) येथील विनोद त्रिंबक गायकवाड (वय 40 वर्षे) यांनी स्वतःच्या शेतात आंब्याच्या झाडाला मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून चिठ्ठी लिहून गळफास लावून आत्महत्या केली.विनोद गायकवाड हे धंदा शेती करत असून तसेच ट्रॅक्टर टेम्पो ड्रायव्हर रा. सरमकुंडी याने रात्री शेतातील आंब्याचे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतदेह RH हॉस्पिटल वाशी येथे आणण्यात आला असून पुढील अधिक तपास सुरू आहे. गायकवाड यांच्या पश्च्यात पत्नी,पाच वर्षाची मुलगी, एक भाऊ आणि आई आहेत.
काय लिहिले चिठ्ठीत
मी माझ्या समाजाला हे सरकार आरक्षण देत नाही म्हणून आता आंदोलन करून कंटाळलो आहे, त्यामुळे मी मरून जात आहे त्यामुळे मी फाशी घेतली

दोन दिवसांपूर्वी वाशी येथे मनोज जरांगे यांची सभा पार पडली होती. सभेमध्ये बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी यापुढे आरक्षणासाठी कोणीही आत्महत्या करू नये, आरक्षणासाठी एकही बळी जाता कामा नये, असे सांगितले असताना देखील त्रिंबक गायकवाड यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.