वनडे विश्वचषक 2023 मध्ये गुरुवारी (16 नोव्हेंबर) दुसरा उपांत्य सामना खेळला गेला. कोलकात्याचा ईडन गार्डनवर झालेल्या सामन्यात दोन्ही संघांनी विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात अखेर दक्षिण आफ्रिकेला पराभव पत्करावा लागला. यामुळे पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेचा स्वप्न भंग झाला आहे. थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवत 8 व्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम लढत आता भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होईल.