एकदिवसीय विश्वचषक 2023 मधील अंतिम सामना रविवारी (19 नोव्हेंबर) खेळला गेला. यजमान भारत आणि पाच वेळचे विश्वविजेते ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर 241 धावांचे माफक आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना ट्रेविस हेड याने शतक तर मार्नस लॅब्युशेन याने झुंजार अर्धशतक करत असलेल्या 6 गडी राखून विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाचे हे सहावे वनडे विश्वविजेतेपद ठरले.