वाशी – वाशी तालुक्यातील पारगाव येथे महाराष्ट्र राज्याचे लाडके आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत साहेब यांच्या प्रयत्नातून नागरी सुविधा या योजनेतून 15 लाखाच्या सिमेंट रस्त्याचे काम आज शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख विकास तळेकर यांच्या उपस्थितीमध्ये गावातील जेष्ठांच्या हस्ते श्रीफळ फोडून सिमेंट रस्त्याचे कामाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी विकास तळेकर यांच्या सोबत गावातील बाबू मोटे,बाळासाहेब मोटे, दिगंबर मोटे, सुहास कुलकर्णी, चंद्रहास माने, चंद्रकांत माने,सतीश कोठावळे,तानाजी कोकाटे,राजा कोळी, बाबा हारे, मुजमिल पठाण, लहूदास चव्हाण,पंकज चव्हाण,अशोक जाधव, महेश कोकणे, महेश गिराम, लोकमतचे पत्रकार राहुल डोके, माऊली ताटे, राजाभाऊ जाधव, बाळू आहीरे, दीपक जाधव, बासू तांबोळी, युवराज बाराते, रामभाऊ सोनटक्के, संभाजी सोनटक्के,वैभव कुलकर्णी, आदी गावातील नागरिक उपस्थित होते.

गाव स्थापन झाल्यापासून या घरासमोर रस्ता नसल्यामुळे पावसाळ्यामध्ये या नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्य सविता विकास तळेकर यांच्या फंडातून या रस्त्याला तीन लाखाचा निधी देऊन रस्ता करण्यात आला होता.आता आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत साहेब यांच्या प्रयत्नातून पंधरा लाखाचा निधी मिळाल्यामुळे हा रस्ता पूर्ण झाला. यामुळे गावकऱ्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.