एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय व माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचे विश्वासू विकी चव्हाण यांचं नाव आघाडीवर
धाराशिव – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आरक्षण जाहीर झाल्यापासूनच राजकीय पक्ष तसेच इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे.
धाराशिव जिल्ह्यात सध्या नगरपरिषद निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची लगबग सुरू असून इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत. महायुतीतील भाजप व महाविकास आघाडीच्या काल पासून मुलखाती सुरू झाल्या आहेत. ही सर्व जुळवाजुळव सुरू असताना पुढील काही दिवसांतच पार पडणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शड्डू ठोकलेल्या इच्छुकांनी पडद्या मागून हालचाली सुरू केल्या असून राजकीय समीकारणांची जुळवाजुळव सुरू केली आहे. आपल्यालाच उमेदवारीची संधी मिळावी यासाठी पक्षातील वरिष्ठांच्या गाठीभेटी, मतदार क्षेत्रातील चाचपणी, मतदारांच्या गाटीभेटी यावर लक्ष केंद्रीत केले आहे.
धाराशिव जिल्हा परिषदेसाठी सध्या जोरदार चर्चा सुरू आहे ती म्हणजे तेरखेडा जिल्हा परिषद गटाची. मागच्या आठवड्यात माजी मंत्री आमदार तानाजी सावंत मतदार संघांत बैठका घेत आगामी निवडणुकांसाठी ‘एकला चलो’ चा नारा देत कार्यकर्त्यांमध्ये उर्जा निर्माण केली. सावंतांनी राजकीय भूमिका स्पष्ट केल्याने इच्छुकांना देखील आपले ‘राजकीय बस्तान’ बसवण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.
तेरखेडा जिल्हापरिषद गटातून शिवसेना शिंदे गटाकडून सध्या आघाडीवर आणि चर्चेत नाव आहे ते म्हणजे विकी चव्हाण यांचं. चव्हाण यांनी आमदार सावंत यांना विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आणण्यासाठी तेरखेडा सर्कल मधून ‘मोलाचा वाटा’ उचलला आहे. विकी चव्हाण यांची ओळख ही सावंतांचा कट्टर कार्यकर्ता अशी असून सावंत कुटुंबीयांचे ते विश्वासू देखील मानले जातात. विकी चव्हाण यांचा जनसंपर्क दांडगा असून युवा मतदार वर्गामध्ये त्यांची ‘क्रेझ’ पहायला मिळत आहे. विकी चव्हाण हे तेरखेडा परिसरातील गोर-गरिबांच्या समस्या सोडवण्यासाठी हिरारीने पुढाकार घेत समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. विठ्ठल फायर ह्या त्यांच्या फटाका निर्मिती व विक्री व्यवसायातून त्यांनी अनेकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तरुण पिढीमध्ये ते सध्या सोशल मिडियामध्ये ट्रेडिंग ला असून ‘रिल्स’ च्या माध्यमातून चव्हाण यांच्या समर्थकांनी सोशल मिडिया दणाणून सोडला आहे.
शिवसेनेते मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय तसेच माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचे विश्वासू असल्याने आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तेरखेडा गटातून विकी चव्हाण हेच प्रबळ दावेदार मानले जात आहेत. चव्हाण यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना व मित्रमंडळी तसेच गावकऱ्यांना देखील विकी चव्हाण यांना संधी मिळेल असा विश्वास आहे.











