धाराशिव – धाराशिव जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीचे अनैतिक संबंध सहन न झाल्याने पतीने व्हिडिओ बनवून दुःख व्यक्त करत आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
बाबत अधिक माहिती अशी की धाराशिव तालुक्यातील आळणी येथील तानाजी नानासाहेब भराडे यांच्या पत्नीचे धाराशिव मधील एका व्यावसायिक पुरुषासोबत अनैतिक संबंध होते. हे संबंध सहन न झाल्यामुळे भराडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली
पत्नीच्या प्रियकर हा भराडे यांना वारंवार त्रास देत होता असं भराडे यांनी व्हिडिओ मध्ये सांगितले आहे. तानाजी भराडे यांना मानसिक त्रास होऊ लागल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. पत्नी व तिच्या प्रियकराच्या मानसिक त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे असा व्हिडिओ चित्रित करून त्यांनी सोशल मीडियावर शेयर केला व त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या करत आयुष्य संपवले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून भराडे यांच्या नातेवाईकांनी संबंधित आरोपींवर कठोर कारवाही करण्याची मागणी केली आहे.