धाराशिव – मराठवाड्यातील वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक मध्ये करण्याबाबतचा शासन निर्णय तात्काळ निर्गमीत करावा अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
मराठवाडयातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक मध्ये करण्याची मागणी ६० वर्षापासुनची होती. याबाबत १३ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाडा विभागातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक मध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु अद्यापपर्यंत या बाबतीत शासन निर्णय निर्गमीत करण्यात आलेला नाही.

त्यामुळे मागील ६० वर्षापासुनची असणारी मागणी अद्यापही प्रलंबित आहे. मंत्री मंडळाच्या बैठीकीत मान्यता मिळून देखील शासन निर्णय अद्याप का निर्गमित झाला नाही असा प्रश्न आमदार पाटील यांनी विचारला आहे.
अधिक अपडेटस् साठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा
मराठवाडयातील वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक मध्ये करण्याबाबतचा शासन निर्णय तात्काळ निर्गमीत करावा अशी मागणी पाटील यांनी सरकारला केली आहे.