कलेक्टरांचे आदेश असतानाही कारवाई नाही? उलट सुलट चर्चेला आले उधाण
धाराशिव – वाशी तालुक्यातील पिंपळगांव (लिंगी) येथील भिम नगरच्या प्रवेशद्वार येथील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची असणारी कमान आहे. तर या कमानी जवळील काही भाग अवैध धंद्यासाठी गावकरी अतिक्रमण करीत आहेत. त्यामुळे त्याबाबत त्यांच्यावर कारवाई करुन ती कमान अतिक्रमणाच्या विळख्यातुन मुक्त करण्यात यावी अशी मागणी बौद्ध समाजाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक यांनी त्या ठिकाणी तात्काळ भेट देऊन योग्य ती कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. परंतू अद्यापपर्यत तरी कुठलीच कारवाई संबंधित विभागाने केली नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची पायमल्ली केल्याचे संबंधित विभागाकडून दिसून येत आहे. सदर प्रकरणी योग्य ती कारवाई करून संबंधितांविरूध्द कडक कारवाई न झाल्यास यापुढे आंदोलन करण्याचा इशाराही येथील बौध्द बांधवांच्यावतीने देण्यात आला आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद की, वाशी तालुक्यातील पिंपळगाव (लिंगी) भिमनगरमध्ये प्रवेश करण्यासाठी तेथील बौध्द समाजाने वर्गणी करुन महामानव भारतरन्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आरसीसीची 25 वर्षापूर्वी कमान बांधलेली आहे. सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कमानी जवळ ऋषीकेश लोकरे व बाळासाहेब मारुती सुकाळे या दोघांनी या कमानी जवळ त्यांच्या मालकीची जागा नसताना अतिक्रमण करुन पत्र्याचे शेड उभारुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब अआंबेडकर यांचा अपमान होईल या हेतुने सदर शेडमध्ये दारु विकी, मटका व इतर जुगार असे व्यवसाय चालविले जातात. तसेच डॉ. बाबाबासाहेब अबिडकर यांच्या कमानीजवळ ग्रामपंचायत कार्यालय पिंपळगांव (लिंगी) यांनी गावच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ पाण्याचा वाल बसविला आहे. त्या ठिकाणी बौध्द समाजातील महिला पाणी भरण्यासाठी सतत जात येत असतात. त्या ठिकाणी असलेली कमानीचे पावित्र्य नष्ट होऊन गावातील सामाजिक सौहार्दाचे वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. याबाबत पंचायत समिती बाशी जिल्हा परिषद पोलीस ठाणे यांच्याकडे वारंवार मागणी केली. परंतू कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांचे कांही आर्थिक देणे-घेणे आहे की काय? असा संशय येत आहे. तरी याउपरही कारवाई न झाल्यास बौध्द बांधवांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. यावर निवेदनावरती सुशील गाडे, रतन गाडे, उमेश गाडे, सिध्दार्थ गाडे, रमेश गाडे, रवि गाडे, किशोर गाडे, सुरज गाडे, रणजित गाडे, सर्जेराव गाडे, किरण गाडे, धनंजय गाडे, रत्नदीप गाडे, विलास गाडे, समाधान गाडे, रत्नदीप गाडे, परमेश्वर गाडे, रामेश्वर गाडे अंगद गाडे, उमेश गाडे, माणिक गाडे, आजिनाथ गाडे आदींसह इतर 50 ते 60 जणांच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावरती आहेत.