• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, March 29, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन📰 सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

यू-ट्युबच्या पत्रकाराला धक्काबुक्की पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत राज्यात पहिला गुन्हा दाखल

MH25News by MH25News
January 23, 2024
in उद्योग, ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
यू-ट्युबच्या पत्रकाराला धक्काबुक्की पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत राज्यात पहिला गुन्हा दाखल
0
SHARES
0
VIEWS

‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या पाठपुराव्याला यश

Follow us on social media:

सोलापूर – माझ्याविरुद्ध बातमी देतोस का, असा राग मनात धरून, पत्रकारास धमकी देत धक्काबुक्की करून वार्तांकनास अडथळा निर्माण केल्याप्रकरणी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या प्रयत्नाने यू-ट्युब चॅनेलच्या पत्रकारावर हल्लाप्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत बार्शी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात एखाद्या यू-ट्युब चॅनेल पत्रकारावर हल्लाप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ च्या पाठपुराव्यामुळे हा राज्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे.
बार्शी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किरण माने ( प्रोजेक्ट मॅनेजर, स्वयम शिक्षण प्रयोग रा. धाराशिव) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. उमेद अभियानांतर्गत काम करणाऱ्या महिलांचे मानधन न मिळाल्याबाबत `हिंदवी समाचार’चे संपादक धीरज शेळके यांनी बातमी प्रसारित केली होती. पत्रकार शेळके यांनी स्वयम शिक्षण प्रयोगचे प्रोजेक्ट मॅनेजर किरण माने यांची झालेल्या प्रकाराबाबत प्रतिक्रिया मागितली असता, वार्तांकन केल्याचा राग मनात धरून किरण माने यांनी धीरज शेळके यांना धक्काबुक्की करत धमकावले. तसेच वार्तांकन चालू असताना वार्तांकनासाठी वापरण्यात येत असलेला मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी बार्शी येथील ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे राज्य उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ, जिल्हा उपाध्यक्ष गणेश भोळे, बार्शी तालुका अध्यक्ष संदीप मठपती, हर्षद लोहार, प्रदीप माळी, शाम थोरात, विजय शिंगाडे, अस्लम काझी, मयूर थोरात, समाधान चव्हाण यांनी पत्रकार धीरज शेळके यांना धीर दिला. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका घेतल्याने प्रोजेक्ट मॅनेजर किरण माने यांच्याविरोधात भादंवि कलम 323, 504, 506 तसेच महाराष्ट्र पत्रकार संरक्षण कायदा कलम 3 व 4 अन्वये बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ पत्रकार हल्लाविरोधी फोरमचे राज्य अध्यक्ष संदीप महाजन यांनी सांगितले की, 2017 साली अस्तित्वात आलेल्या पत्रकार संरक्षण कायदाप्रकरणी अंमलबजावणी कडकपणे झाली पाहिजे, यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या बारामती येथील अधिवेशनात ठराव मंजूर करण्यात आला होता. या प्रकरणी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागपूर हिवाळी अधिवेशन काळात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने साखळी उपोषण केले होते. या प्रकरणी राज्य शासनाला अनेक वेळा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे पदाधिकारी भेटले होते. परिणामी शासन स्तरावर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या पाठपुराव्याची वेळोवेळी दखल घेण्यात आली. बार्शीमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याबद्दल महाजन यांनी समाधान व्यक्त केले. राज्यभर हा कायदा सक्षम होण्यासाठी आम्ही टीम उभी केली आहे, असेही महाजन यांनी यावेळी सांगितले.
पत्रकार धीरज शेळके यांनी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे पत्राच्या माध्यमातून आभार मानले आहेत. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राज्यध्यक्ष अनिल म्हस्के यांनी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या सर्व टीमचे अभिनंदन केले आहे.

संबंधित बातम्या

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
ग्रामीण

आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

March 15, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!