धाराशिव– धाराशिव नगर परिषदेअंतर्गत शहरातील विविध विकासकामांचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच हसते करण्यात आला. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे, पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून कामांना सुरूवात करण्यात आली. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक अंबादास दानवे, नागेश जगदाळे, किशोर पवार, विजय मुद्दे, नाना कळसकर, गणेश आसलेकर, सतीश कदम, अमित कदम, संजय (पप्पू) मुंडे, भीमा जाधव, पिंटू पवार, संतोष कुलकर्णी, सोनू कुलकर्णी, अॅड.अजित दानवे, सादिक तांबोळी, रोहन मुंडे, कुणाल धोत्रीकर, सुनील मोरे, प्रवीण चौधरी, शुभम पांढरे, शिवसेना शहर उपप्रमुख रजनीकांत माळाळे, शिवसेना शहर संघटक चौधरी, प्रणिल रणखांब, नितीन घोरपडे, ज्ञानेश्वर ठवरे, जावेद शेख यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.