धाराशिव – वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास शासकीय मान्यता मिळाली आहे. या निर्णयामुळे तेरखेडा आणि आसपासच्या गावातील नागरिकांना अपघात व अन्य आपत्कालीन प्रसंगी त्वरित आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.
राष्ट्रीय महामार्ग ५२ जवळील अपघातप्रवण क्षेत्रामुळे अनेक गंभीर रुग्ण धाराशिव किंवा सोलापूर येथील मोठ्या रुग्णालयात पोहोचण्याआधीच प्राण गमवावे लागत असल्या कारणाने तसेच तेरखेडा परिसरातील फटाका कारखान्यांमधील कामगारांसाठी तातडीच्या उपचारांची गरज पडत असताना आता या उपजिल्हा रुग्णालयामुळे या सर्वांना तसेच परिसरातील नागरिकांना तातडीच्या वैद्यकीय सेवांचा लाभ मिळेल आणि मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज कमी होईल तसेच उपचारांचा खर्च देखील कमी होईल असे नागरिकांमधून बोलले जात आहे